अहिल्यानगर (जिल्हा क्राइम रिपोर्टर अण्णासाहेब बनसोडे) : संगमनेर तालुक्यातील निमोण येथील भूमिपुत्र व सध्या येवला येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले संदीप पुंजा मंडलिक यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांच्या हस्ते तिसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले.
नक्षलवाद संपविण्याच्या कार्यवाहीमध्ये मोलाचा सहभाग
पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असतांना गडचिरोली येथील नक्षलवादी संपुष्ठात आणण्यासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना राष्ट्रपती शौर्य पदक देण्यात आले.पोलीस निरीक्षक मंडलिक हे महाराष्ट्रातील गडचिरोली येथे २०१३ ते २०२४ या कालावधीत कार्यरत असतांना गडचिरोली जिह्यातील खोब्रामेंढा या गावालगत असलेल्या जंगलामध्ये झालेल्या नक्षली चकमकीमध्ये पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात त्यांना यश प्राप्त होते.







