नवी मुंबई रबाळे पोलीसांची कामगिरी : तब्बल १९ लाखाच्या दागिन्यांची चोरी बारा तासात उघड

रबाळे पोलीसांची

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : नवी मुंबईतील रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या तब्बल १९ लाखांच्या दागिन्याच्या चोरीचा गुन्हा तात्काळ तपास करत बारा तासात उघड करण्याची कामगिरी रबाळे पोलिसांनी केली आहे.

फिर्यादी शकुंतला शंकर गायकर वय 58 वर्ष धंदा भाजी विक्री राहणार करंजाडे नवी मुंबई ही महिला दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी घनसोली येथील बाजारामध्ये आलेली असताना तिचे एकूण १९ लाख १३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व एक ओप्पो कंपनीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता.
सदरची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे पोलीस हवालदार वाईंगणकर कारण काळ राजेश तडवी राहुल साळुंखे यांच्या पथकाने त्वरित घटनास्थळी जाऊन घनसोली ते तळवली परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून सदर महिलेचे दागिने हस्तगत केले. संशयित आरोपी निष्पन्न केले व एकूण १९ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल फिर्यादी महिला शकुंतला गायकर यांना ताब्यात दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here