भ्रष्टाचार प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी; अन्यथा १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाचा इशारा..

एसआयटी

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर अशोक तायडे) : भीम आर्मी भारत एकता मिशनच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. प्रकाश आबिटकर यांची मंत्रालयात भेट घेऊन जळगाव जिल्ह्यातील “आपला दवाखाना” आणि वर्धनी केंद्र शहरी आरोग्य केंद्रांमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी डॉ. सचिन भायेकर यांच्यावर SIT (विशेष तपास पथक) मार्फत चौकशी करून तात्काळ निलंबनाची कार्यवाही करावी, अशी मागणी केली.

या निवेदनात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, वर्धनी केंद्र व शहरी आरोग्य केंद्र या योजना १५व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत राबवण्यात येत आहेत. यासाठी आलेल्या कोट्यवधी निधीचा अपहार झाला असल्याचे गंभीर आरोप आहेत., हा निधी जनतेच्या आरोग्य सेवेकरिता वापरायचा असूनही, त्याचा गैरवापर झाल्याची चर्चा सार्वजनिक पातळीवर मोठ्या प्रमाणात होत आहे., डॉ. सचिन भायेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून या संपूर्ण प्रकरणात थेट सहभागी असल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे., १४ जून २०२४ रोजी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती जाहीर करून SIT मार्फत चौकशीची मागणी करण्यात आली होती., मात्र, आजपर्यंत कोणतीही चौकशी अथवा शिस्तभंगाची कारवाई झालेली नाही, यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर आणि संतापजनक ठरत आहे. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
तातडीने चौकशी व कारवाई केली नाही, तर १५ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी जळगांव यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा भीम आर्मीने प्रशासनाला दिला आहे. निवेदन देतांना भीम आर्मी भारत एकता मिशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ सपकाळे, जुनेद भाई शेख, श्रीकांत वानखेडे, भीम आर्मी भुसावळ तालुका अध्यक्ष जावेद शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here