आनंद ॲग्रो केअर कंपनीला गिरणाकाठच्या शेतकऱ्यांनी दिली भेट

कुबेर जाधव

नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) : उषा फर्टिलायझर भऊर च्या माध्यमातून गावातील अन् देवळा तालुक्यातील जवळपास ६०ते ६५ शूतकऱ्यांच्या ग्रुपने दिंडोरी तालुक्यातील तळेगाव नजदीक असलेल्या आनंद अग्रो केअर कंपनीला भेट दिली पाच सहा तास थांबून कंपनीत तयार होणाऱ्या विविध सेंद्रिय, व रसायण मुक्त शेतीसाठी आवश्यक असलेले विविध प्रकारची जैविक खते, पावडर,लिक्विड, क्याप्सुल च्या स्वरुपात तयार करून शेतकऱ्यांना माफक दरात उपलब्ध करून दिली जातात, बॅक्टेरीया जमीनीसाठी किती उपयुक्त आणि कसे तयार केले जातात सोबत माती व पाणी परीक्षण यांचे महत्व पटवून देत शेकर्यांसाठी मोलाचे मार्गदर्शन मिळाले

आज पर्यंत आपण शुन्यातून विश्व निर्माण होते, असे ऎकले होते मात्र ते साक्षात अनुभवायला मिळाले त्याचे कारण म्हणजे आनंद ॲग्रो केअर चे चेअरमन मा.श्री घनशाम हेमाडे त्यांनी शेती निगडीत मुळ विषय हाताळत बॅक्टेरिया जीवानू निर्माण केल्याचे धाडस केले आणि आपल्या अथक प्रयत्नातून २००९ साली आनंद ॲग्रो केअर सारखे मोठे उद्दिष्ट साक्षात उभे केले आहे, असे संबोधून कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक तथा शेतकरी नेते कुबेर जाधव यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना आवर्जून सांगितले,

एक दिवसीय कार्यशाळेसाठी उपस्थित शेतकरी बांधव

चेअरमन घनश्याम हेमाडे म्हणजे साधे भोळे व्यक्तीमहत्व आज गगणाशी घेतेय भरारी शिकवणीचा करूनी अभ्यास शेतकऱ्यांना देउ उभारी.ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत आहे. या पाहणी दौऱ्यात माती आणि पाणी परीक्षणाची लॅब त्यातील नमुने कसे परीक्षण करतात याची सखोल माहिती तसेच जमीनीसाठी महत्वाचे म्हणजे ब्यॅक्टेरीया कसे तयार होतात? आणि त्यांचे कार्य काय? किंवा किती दिवस पर्यंत त्यांचा कार्यकाळ? यांची सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी कंपनी चे व्यवस्थापक खंडेराव.धारवार यांनी जैविक उत्पादना विषयी सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली, अनेक मान्यवर उपस्थित शेतकऱ्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले, यावेळी कंपनीचे संदीप साळवे, सोसायटी चेअरमन दिपक पवार, भउर चे प्रगतिशील शेतकरी कवी आभा आहेर, यांनी मनोगत व्यक्त केले तर शेतकरी नेते कुबेर जाधव यांनी कंपनीचे आभार मानत शुभेच्छा दिल्यात.
यावेळी भउर विठेवाडी परीसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते,यात प्रामुख्याने उष्ण फर्टिलायझरचे संचालक दीपक पवार,नयन पवार, काशिनाथ पवार, सुभाष पवार, दादाजी देवरे, गंगाधर पवार, सुधाकर पवार,पोपट आहीरे,दिनु देवरे, कैलास आहेर,योग सुर्यवंशी, भाऊसाहेब अहिरे , सुनिल पवार, बाळासाहेब पवार आदी शेतकरी उपस्थित होते, कंपनिच्या संचालिका सौ शोभा हेमाडे यांनी पुर्ण वेळ जातीने हजर राहून उपस्थित शेतकऱ्यांना सन्मानित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here