पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त दिल्ली येथे देशाचे केंद्रीय समाज कल्याण राज्य मंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ गौरव पुरस्कार अँड. बादल यादव यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थित लालसिंह जी आर्या (राष्ट्रीय अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती भा. ज. पा.), डॉ.अनिलजी बोन्डे (खासदार राज्यसभा), डॉ. सुनिलजी गायकवाड (मा. खासदार लातूर), आमदार रामभाऊ गुंडिले आदी खासदार आमदार उपस्थित मोठा उत्सवात लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची दिल्ली येते जयंती साजरी करण्यात आली.








