वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहात नैराश्यातून विद्यार्थिनीने घेतला गळफास

sucide-by-girl
प्रतीकात्मक चित्र

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात एका खोलीमध्ये विद्यार्थिनीने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव ज्योती कृष्णकुमार मीना (वय २३, रा. राजस्थान) असे आहे. ती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्षातशिक्षण घेत होती. ती कॉलेजच्या वसतिगृहामध्ये राहत होती. मंगळवारी रात्री तिने एका मोकळ्या खोलीमध्ये गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं.

आत्महत्या करण्यापूर्वी ज्योतीने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. तिने चिठ्ठीत आपल्या आई वडिलांची माफी मागितली आहे. या घटनेची माहिती समजताच सहकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना तिने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे. ती नैराश्यात होती अशी माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. आत्महत्या करण्या मगच नेमकं कारण काय हे समजू शकले नाही. अशी माहिती बंडगार्डन पोलिसांनी दिली आहे.
ज्योतीला डॉक्टर व्ह्याच होत. ज्योती हीने मानसिक तणावामुले आत्महत्या केल्याची माहिती आहे. मध्यरात्री दोन वाजल्याचा सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. ज्योतीची मानसिक आजाराची ट्रीटमेंट सुरु होती, अशी माहिती आहे. तिच्या काही औषध-गोळ्या देखील सुरु होत्या. विद्यार्थिनी आठवीत असल्यापासूनच मानसिक रुग्ण होती. सुसाईड नोटमधून तिच्या आत्महत्येच्या कारणाचा उलगडा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here