दारूसाठी पैसे न दिल्याच्या राग : शिक्षकाच्या डोक्यात टाकला दगड

crime
file photo

अहमदनगर (प्रतिनिधी) : दारू प्यायला ५० रूपये दिले नाही; या रागातून एका १७ वर्षीय मुलाने रस्त्याने जाणाऱ्या शिक्षकाच्या डोक्यात दगड टाकून गंभीर जखमी केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातील शिक्षण प्रशिक्षण केंद्रातील तंत्रज्ञ सुहास वाघमारे हे ६ ऑगस्टच्या रात्री रस्त्याने जात होते. यावेळी त्यांना एका तरुणाने अडवले. आधीच नशेत धुंद असलेल्या तरुणाने वाघमारे यांच्याकडे दारू पिण्यासाठी ५० रुपयांची मागणी केली. मात्र वाघमारे यांनी त्या तरुणाला नकार देताच संबंधित तरुणाने त्यांना खाली पाडून मारहाण केली आणि बाजूला पडलेला दगड उचलून डोक्यात टाकला.
दगडाने मारहाण झाल्याने सुहास वाघमारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर, कानावर गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर आरोपी तरुणाने अत्यव्यवस्थ पडलेल्या वाघमारे यांच्या खिशातील रक्कम घेऊन पोबारा केला. रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी जखमी वाघमारे यांना बघितल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here