नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : अंमली पदार्थ विरोधी पथकाने मालाड, जोगेश्वरी, दादर आणि एमआयडीसी नवी मुंबई परिसरात मोठी कारवाई केलीय. एकाचवेळी केलेल्या चार वेगवेगळ्या कारवायांतून तब्बल ४.०३४ किलो ‘मेफेड्रॉन’ (एम.डी.) अंमली पदार्थ जप्त केलाय. जप्त केलेल्या मालाची किंमत सुमारे १०.०७ कोटी रुपये आहे. याप्रकरणात ५ जणांना अटक करण्यात आलीय. अटक आरोपींपैकी एक नायजेरियन नागरिक आहे.
२८ जुलै ते ७ ऑगस्टदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार घाटकोपर, बांद्रा आणि वरळी युनिटच्या पथकांनी स्वतंत्र छापे टाकले. यात जोगेश्वरी पश्चिम, मालाड पूर्व व दादर पश्चिम परिसरातून एम.डी. अंमली पदार्थ जप्त झाला. तर एमआयडीसी, नवी मुंबईतून पाहिजे असलेल्या नायजेरियन आरोपीकडूनही मोठ्या प्रमाणात एम.डी. हस्तगत करण्यात आला.







