चाकण पोलिसांनी सराईत चोरांकडून १५ चोरीच्या मोटारसायकली केल्या जप्त; १६ गुन्ह्याची उकल

मोटारसायकली

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : पिंपरी चिंचवड परिसरात दुचाकी चोरणाऱ्या दोघांना चाकण पोलीस ठाण्यातील विशेष पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून ८ लाख रुपये किंमतीच्या १५ दुचाकी जप्त करुन ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

पोलिसांनी या प्रकरणी योगेश तुकाराम देवकर (वय-३०), दत्तात्रय गंगाराम गाडेबैल (वय- २६ दोघे रा. कवठे यमाई, ता. शिरूर, पुणे) यांना अटक केली आहे. चाकण परिसरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी चाकण पोलिसांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले होते.
या पथकाने वाहन चोरी झालेल्या घटनास्थळापासून परिसरातील १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेतला. पथकाने तांत्रिक विश्लेषण करुन घटनास्थळी दिसलेल्या व्यक्तींची माहिती प्राप्त केली. चाकण परिसरात दुचाकी चोरणाऱ्या योगेश देवकर व दत्तात्रय गाडेबैल हे दोन आरोपी निष्पन्न केले.
आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडे सखोल चौकशी करुन चाकण पोलीस स्टेशन व इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेल्या ८ लाख रुपये किमतीच्या १५ दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईत चाकण पोलीस ठाण्यातील ७, दिघी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. उर्वरित सहा दुचाकींच्या मूळ मालकांचा शोध चाकण पोलीस घेत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रसंन्न जऱ्हाड करीत आहेत.)
आरोपींकडून स्प्लेंडर (MH 14 GG 5282), 2. सीबी शाईन (MH 46 BL 9788), 3. सीडी डिलक्स (MH 14 DB 2610), स्प्लेंडर (MH 14 JT 9935). 5. स्प्लेंडर (MH 12 DV 1115), 6. यमाहा आर 15 (MH 12 RG 6378), स्प्लेंडर (MH 14 KE 5746), 8. सीडी डिलक्स (MH 17 AC 9866), 9. बजाज पल्सर (MH 14 FQ 3134), स्प्लेंडर (नंबर प्लेट नाही), 11. स्प्लेंडर (MH 14 FV 8306), 12. स्प्लेंडर (MH 12 WA 6255), सुझुकी जीए (MH 42 P 3124), 14. स्प्लेंडर (नंबर प्लेट नाही), 15. स्प्लेंडर (नंबर प्लेट नाही) या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम , पोलीस निरीक्षक गुन्हे युनुस मुलाणी, सहायक पोलीस निरीक्षक प्रसंन्न जऱ्हाड, विक्रम गायकवाड, पोलीस अंमलदार संदीप सोनवणे, राजु जाधव, हनुमंत कांबळे, निखिल शेटे, नितीन गुंजाळ, सुनील भागवत, संदीप गंगावणे, अशोक दिवटे, महेश कोळी, विवेक सानप, प्रतिक चव्हाण, अरुण शिंदे, महादेव बिक्कड, माधुरी कचाटे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here