कुटुंबावर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला; १२ जखमी

marhan
file photo

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : येथील तळोजा परिसरातून एक प्रकार समोर आला आहे. काही लोकांनी मुस्लिम कुटुंबावर धारधार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याचं समोर आलं आहे. मुस्लिम कुटुंब एका गावातून शुक्रवाररी दुपारी नमाज अदा करून घरी परतत होते. या हल्ल्यात किमान १२ जण जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, स्थानिक स्तरावरील वैयत्तिक वादामुळे हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. हल्लेखोरांकडून धारधार शस्त्रं होती आणि त्यांनी मुस्लिम बांधवांवर थेट वार केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परंतु अद्याप कोणताही अधिकृत गुन्हा तळोजा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेला नाही आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, पोलिसांकडून आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु असून, त्यामुळे पीडित कुटुंबांना न्याय मिळण्यात अडथळे येत आहेत.
पिडीतांनी वारंवार तक्रारी केली परंतु पोलिसांनी गंभीरपणे दाखल घेतली नाही, उलट गुन्हा नोंदवण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्यामुळे पोलिसांवर रोष व्यक्त केला जात आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे आता या प्रकरणाची जबाबदारी आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि मुस्लिम संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी पोलीस आयुक्तांकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. या हिंसक घटनेनंतर तळोजा परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून, पोलिसांकडून निष्पक्ष कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here