किरण मोरे यांच्या व्यंगचित्रासह कांदा पोहचला संसदेत, विरोधी खासदारांनी दाखवलं एकजुटीचे दर्शन

कांदा

नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) : आज सकाळी (दि,१२ आगस्ट) संसदेच्या प्रेवेश द्वारावर हातात व गळ्यात कांद्याच्या माळा,तसेच बागलाण तालुक्यातील मोरे नगर येथील कांदा उत्पादक शेतकरी किरण मोरे यांनी रेखाटलेली कांद्याच्या भावाच्या संदर्भातील व्यंगचित्र हातात घेऊन नाशिक सह उत्तर महाराष्ट्रातील खासदाराची प्रतिमा असलेले व्यंगचित्रे हातात घेऊन घोषणाबाजी केली,व संपूर्ण देशासह सत्ताधाऱ्याचे लक्ष वेधून घेतले, त्याबद्दल सर्वच विरोधातील खासदारांचे अभिनंदन होत आहे.

दिंडोरीचे खासदार भास्करराव भगरे यांनी एका हातात व्यंगचित्र आणि दुसऱ्या हातात कांद्याची माळ घेऊन जोरदारपणे निदर्शने केली,नाफेड आणि एनसिसिएफच्या च्या बोगस कांदा खरेदीचा पर्दाफाश करत निर्यातीला प्रोत्साहन व, तसेच कांद्याला तात्काळ ५०० रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यात यावे इत्यादी मागण्यांसाठी सर्वच विरोधी खासदारांनी मागणी लावून धरली,संसद परिसर दणाणून सोडला, गेल्या १०/१२ दिवसांपासून कांदा उत्पादक व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी, उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींची व्यंगचित्रे रेखाटुन निवेदनाद्वारे लक्ष वेधून घेतले होते, त्याची दखल घेत नाशिक सह उत्तर महाराष्ट्रातील खासदारांनी घेऊन खा, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले, कांदा
यात कांग्रेस खासदार डॉ शोभा बच्छाव,खा भास्करराव भगरे,खा, राजाभाऊ वाजे, बजरंग सोनवणे,खा, निलेश लंके,खा अरविंद सावंत, हे सहभागी झाले होते, खासदारांनी कांद्याच्या माळा घालून थेट संसदेत पोहोचले, कांदा प्रक्ष्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असताना केंद्र सरकार या बाबतीत उदासीन असल्याचे दिसून येत आहे, गुजरात सरकारने कांद्यासाठी ३०० रूपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केले , ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना का नाही? असा सवाल खा भास्करराव भगरे यांनी उपस्थित केला व ५०० प्रति क्विंटल अनुदानाची मागणी केली,
दुसरीकडे नाफेड आणि एनसिसिएफचा भ्रष्टाचार उघडकीस आला पाहिजे,त्यांत परप्रांतीयांच्या सुळसुळाट झाला आहे,गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, येथील नांफेडचे दलाल, एजंट, हे दिल्ली दरबारी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नाफेड व एनसिसिएफसाठी बोगस कांदा खरेदी केली आहे, २७ जुन पर्यंत सर्व खरेदी बंद झाली मग यांच्या भव्य मोठ्या खंळ्या मध्ये कांद्याच्या वहानांची गर्दी कशी? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव यांनी उपस्थित केला आहे,आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उत्तर महाराष्ट्रातील सर्वच खासदारांनी एकजुटीचे कांदा प्रश्र्नांवर आवाज उठवला त्याबद्दल व्यंगचित्रकार किरण मोरे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव यांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here