कलात्मक प्रोजेक्ट साकारल्याबद्दल वास्तूविशारद नितीन पारगावकर यांचा गौरव

नितीन पारगावकर

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : अत्यंत कलात्मक पद्धतीने तोंडापूर व फत्तेपूर येथे शिवसृष्टी प्रोजेक्ट साकार केल्याबद्दल सुप्रसिद्ध वास्तुविशारद नितीन पारगावकर यांचा गौरव करण्यात आला. या प्रोजेक्टचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.शिवेंद्रसिंह भोसले, ना. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला.

आज स्वातंत्र्यदिनी प्रशांत सोनवणे, सुप्रिडेंट इंजिनियर PWD यांच्या हस्ते नितीन पारगावकर यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. नितीन पारगावकर यांचे जिल्ह्यात अनेक सरकारी प्रोजेक्ट सुरु आहेत. त्यात शिवसृष्टी, जामनेर येथील रेस्ट हाऊस, धरणगाव ख्वाजा नाईक स्मारक, वारकरी भवन, चौक सुशोभीकरण इत्यादी महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा त्यात समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here