पिंप्री येथे स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा

स्वातंत्र्य दिवस
पिंपरी तालुका शिरपूर येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करताना पिंपरी चे पोलीस पाटील जयपालसिंह गिरासे तसेच पदाधिकारी.

शिरपुर (प्रतिनिधी पवन मराठे) : तालुक्यातील पिंप्री येथील जि.प.मराठी शाळेत आज दि.१५ ऑगस्ट रोजी ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी ध्वजारोहणाचा मान पिंप्रीचे पोलीस पाटील जयपालसिंह गिरासे यांना देण्यात आला. तर याप्रसंगी माजी सरपंच प्रवीण राजपूत, राजेंद्र पाटील, महेंद्र गिरासे, संजय धनगर, माजी उपसरपंच भारत राजपूत, किशोर राजपूत, जितेंद्र कोळी, माजी ग्रामपंचायत सदस्य मनोज राजपूत, वि.का.सेवा सोसायटी उपाध्यक्ष युवराज धनगर, भुरा राजपूत, भिका कोळी, विनोद भिल, गोटू राजपूत, योगेंद्र राजपूत, राजेंद्र धनगर, जितेंद्र धनगर, कोतवाल जयेश धनगर, महेंद्र धनगर, शाळेचे मुख्याध्यापक श्री.पी.एम.मेटकर, शिक्षीका श्रीमती सपना सिसोदिया, सौ.आशा धनगर, सौ.रेणुका राजपूत, मदतनिस प्रमिला राजपूत, आशा‌ सेविका सरला कोळी, रणजीत राजपूत, पंढरीनाथ कोळी, नानाभाऊ कोळी आधी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थांनी देशभक्तीपर गीतांवर समूह नृत्य व कवायत सादर केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.पी.एम.मेटकर यांनी‌ केले तर आभार सौ. सपना सिसोदिया यांनी मानले. कार्यक्रमासाठी गावातील आजी-माजी पदाधिकारी, महिला भगिनी, युवक मित्र, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here