विठेवाडी येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचनी फडकवला कांदा चाळीजवळ तिरंगा

कांदा

नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) : देवळासह संपुर्ण कसमादे मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने मिळवलेला कांदा चाळीत साठवून ठेवलेला होता, परंतु बदलत्या हवामानाचा फटका बसला, त्यामुळे ७० ते ७५ % कांदा चाळीतच सडत चालला आहे, असं असताना शेतकऱ्यांनी ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने इतरत्र कोठेही न जाता, आपल्या घराजवळ असलेल्या शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतातील चाळी समोर रांगोळी काढून स्वातंत्र्यदिन साजरा केला.

घरातील महिलांनी खराब होत असलेल्या कांदा बाजुला करुन चांगल्या कांद्याच्या सहाय्याने व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी वंदे मातरम् हे नाव साकारले,व सर्वांचं लक्ष वेधून घेतले, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा घोषणाबाजी करत जोरदार निषेध नोंदवला, चार पाच दिवसा पूर्वीच व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींचीना व्यंगचित्रातुंन अवगत करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा संसदेच्या पटलावर मांडण्यास भाग पाडत सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते, आज शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष माणिक निकम व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने समन्वयक कुबेर जाधव, व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी एकत्र येऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा राज्यकर्त्याच्या निदर्शनास आणून देण्याच्या उद्देशाने अनोखे झेंडा वंदन साजरं केले.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कांद्यातुन रांगोळीतून वंदे मातरम् नाव साकारले शेतकऱ्यांन जय जवान जय किसान चे फलकही हातात घेऊन सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले, या वेळी पंचक्रोशीतील अनेक कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते, त्यामध्ये व्यंगचित्रकार किरण मोरे,वि का सोसायटी विठेवाडी चे मा, चेअरमन कुबेर जाधव, माणिकराव निकम, सोसायटी संचालक तानाजी निकम, कैलास कोकरे, रमेश निकम, भास्कर निकम, मधुकर निकम, भालचंद्र निकम,केदा निकम, कैलास निकम, सुनिल निकम माधा निकम, क्रुष्णा निकम, प्रदिप निकम,ह, भ,प,पपु निकम, संदीप निकम,तेजस निकम आदी तरूण शेतकरी सामिल झाले होते, या वेळी तरूण शेतकरी संजय निकम यांच्या वाढदिवसही अंत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here