मुंबई (संपादक सुनिल पाटील) : स्वातंत्र्यदिनानिमित्त पवई पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ विरोधी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत एस.ए.पब्लीक स्कूल, अस्मीरा स्कूल तुंगा, साई बांगुर्डा पाडा येथील विद्यार्थी – शिक्षक व स्थानिक नागरिक आणि पवई पोलिस ठाणे तसेच साकीनाका वाहतूक विभागाचे अधिकारी – अंमलदार असे ६०० जणांचा सहभाग होता.
पोलीस उपआयुक्त परिमंडळ १० यांनी अंमलीपदार्थ रॅलीस उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, नागरिकांना अंमली पदार्थांमुळे होणा-या सामाजिक दुष्परिणामांबाबत प्रबोधन केल्यानंतर रॅलीस हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. रॅलीला बीट क्रमांक ३ पासून प्रारंभ होवून, तुंगा गाव, साकीविहार रोड, मोरारजी नगर या नशा प्रभावित भागातून अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात आली. रॅलीत ढोल, ताशे, लेझीम पथक व विविध वेशभूषा केलेल्या विद्यार्थिंनींचा मोठा सहभाग होता.
मोरारजी नगर आय.टी. ओरम पार्क येथे वपोनि जितेंद्र सोनवणे यांनी विद्यार्थी व उपस्थित नागरिकांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणांमांची माहिती दिली. तसेच अंमलीपदार्थ सेवन व विक्रीबाबत पोलीसांना गोपनीय माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.







