संशोधन करिअर म्हणून निवडा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबईचे संशोधक डॉ. सुजय विजय जाधव

टाटा इन्स्टिट्यूट

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : नूतन मराठा महाविद्यालयात सायन्स असोसिएशन व मराठी विज्ञान परिषद जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “संशोधनाकडे वळा ” या विषयावर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च(TIFR) मुंबईचे संशोधक डॉ. विजय जाधव यांचे ” *संशोधनाकडे वळा ” सेमिनार आयोजित करण्यात आले होते

त्या प्रसंगी ते बोलताना म्हणाले की जगातील विविध देशात संशोधन करणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे ते आज खूपच प्रगत आहेत त्यामुळे भारतात संशोधन करणाऱ्यांची संख्या वाढली तर निश्चितच भारत भविष्यात नक्कीच नोबेल पारितोषिक मिळू शकतो आणि आत्मनिर्भर बनू शकतो त्यासाठी विज्ञान क्षेत्रातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी संशोधन वृत्ती जोपासावी, विज्ञान विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी संशोधन कसे करावे याचे सविस्तर उदाहरणासह पावर पॉइंट प्रेझेंटेशन त्यांनी केले
त्यात त्यांनीमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संशोधन म्हणजे काय, त्याचा समाजाला उपयोग काय, संशोधन करण्यासाठी जिज्ञासू वृत्ती कशी जोपासावी यावर मार्गदर्शन केले. आजच्या मानवतेला पडलेला प्रमुख प्रश्न म्हणजे पृथ्वीवर जीवन कसे निर्माण झाले, जीवनासाठी कोणत्या गोष्टी अत्यावशक आहेत, सूर्य आणि पृथ्वी केव्हा व कसे निर्माण झाले, आपल्या सूर्यमालेप्रमाणे विश्वात इतर कुठे पृथ्वी सारखे ग्रह असतील का ज्यावर जीवसृष्टी अस्तिस्वात आहे यांसारख्या विषयावर सध्या जे संशोधन चालू आहे त्याचे थोडक्यात विवेचन केले. तसेच संशोधन या क्षेत्रात इतर देशांच्या तुलनेत आपला भारत देश कसा मागे आहे हे दाखवून आपल्या देशाचे नाव उंचावण्यासाठी तरुणांनी संशोधनाकडे वळायला हवे म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रेरक संवाद साधला. नंतर विद्यार्थी विद्यार्थिनींच्या प्रश्नांना देखील त्यांनी अतिशय त्यांना समजेल या भाषेत त्यांना अतिशय समाधानकारक उत्तरे दिली
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.के .बी. पाटील, प्रमुख पाहुणे संशोधक डॉ. विजय जाधव(T.I.F.R Mumbai),, मराठी विज्ञान परिषदेचे सचिव प्राध्यापक दिलीप भारंबे, सायन्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. आर. बी .देशमुख सर,मराठी विज्ञान परिषदेचे कोषाध्यक्ष प्रानेहते सर , हे होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एफ वाय बीएस्सी ची विद्यार्थिनी कु. इकरा शेख हिने केले पाहुण्यांचा परिचय प्रा. विशाल तेली सर यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन प्रा. कमरीन शेख मॅडम यांनी केले. प्रा. एन. बी बाविस्कर सर, प्रा. नफीसा तडवी मॅडम, प्रा. दुर्गा मॅडम यांनी सहकार्य केले कार्यक्रमास विज्ञान विभागातील बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here