लॉकडाऊनमध्ये परिक्षा घेतल्याने महाविद्यालयावर कारवाई

पुणे (नारायण शेळके) – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात आणि राज्यात लॉकडाऊन सुरु असतांनाही, प्रशासनाने जनतेच्या काळजीसाठी दिलेल्या नियमांचा भंग करून अकरावीची पुर्नपरिक्षा घेणाऱ्या तळेगाव दाभाडे येथील कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्सवर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी छापा मारुन कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तळेगाव दाभाडे येल पंचवटी कॉलनीतील स्नेहवर्धक मंडळ शैक्षणिक ट्रस्टचे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्समध्ये लॉकडाऊन व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करून अकरावीची पुर्नपरिक्षा घेतल्याने, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकारी तथा आपत्ती निवारण अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने संस्थेच्या संचालक मंडळ, प्राचार्य व संबंधित शिक्षक अशा एकूण १४ जणांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ही कारवाई मावळचे तहसीलदार मधुसुदन गर्गे, तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिपक झिंजाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, तळेगाव नगरपरिषद शिक्षण मंडळ प्रशासकीय एस.एम. गावडे यांनी केली आहे. ही परिक्षा सुरु असताना तेथे तब्बल २७ विद्यार्थी असल्याची माहिती समोर येत आहे. राज्य सरकारने आवाहन करुनही लॉकडाऊन मोडण्याचे असे प्रकार होत असल्याने, या कारवाई महत्व प्राप्त झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here