मुसळधार पावसामुळे विक्रोळीत दरड कोसळली; बाप-लेक जागीच ठार

विक्रोळी

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : राज्यात दहीहंडीच्या उत्सवाची तयारी सुरू असतानाच विक्रोळीतील पार्कसाईट येथील वर्षानगर विभागातील मिश्रा कुटुंबावर दरडीचे थर कोसळले. विक्रोळी उपनगरात शनिवारी मध्यरात्री दरड कोसळून बापलेकीचा मृत्यू झाला. सुरेश मिश्रा (५०) आणि शालू मिश्रा (१९) अशी बापलेकीची नावे असून आई, मुलगा आणि शेजारी चौघे जण गंभीर जखमी राहणारे अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवार रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असतानाच, विक्रोळी पार्कसाईट येथील वर्षा नगर विभागातील जनकल्याण सोसायटीमधील मिश्रा कुटुंबाच्या घरावर शनिवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास अचानक डोंगराचा मोठा भाग कोसळला. गाढ झोपेत असतानाच तसेच आजूबाजूला सर्वत्र अंधार असतानाच, ही घटना घडल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. घटनेदरम्यान आवाजामुळे परिसरात एकच झालेल्याखळबळ माजली. शेजाऱ्यांनी तत्काळ दुर्घटनेची माहिती महापालिका आणि अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे जवान आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले.
दरम्यान, पावसाबरोबर डोंगरावरून मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा घरावर कोसळला. त्यामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली मिश्रा कुटुंबिय अडकले होते. काही वेळाने ढिगाऱ्याखालून सुरेशचंद्र मिश्रा, आरती मिश्रा, ऋतुराज मिश्रा आणि शालू मिश्रा या चौघांना बाहेर काढण्यात आले. तसेच या दुर्घटनेत शेजारचे दोघे जणही जखमी झाले. त्यानंतर त्यांना घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच सुरेशचंद्र मिश्रा आणि शालू मिश्रा या बापलेकीचा मृत्यू झाला. तर आरती मिश्रा (४५) आणि ऋतुराज (२०) यांच्यासह अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विक्रोळीतील पार्कसाईट हा डोंगराळ परिसर असून या डोंगरावर मोठी झोपडपट्टी वसलेली आहे. अनेक भागांमध्ये संरक्षक भिंत बांधूनही प्रत्येक पावसाळ्यात याठिकाणी दरडी कोसळण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे पालिका यंत्रणेसह अन्य यंत्रणा दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन करतात. परंतु, येथील नागरिक पालिकेच्या या आवाहनाकडे दुर्लक्ष करतात, अशी प्रतिक्रिया पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here