शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : नुकताच न्याहाळोद येथे मरीआई (मरीमाय) यात्रा उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.मरीआई मूळची तामिळनाडूमधील. मरीअम्मा ही रोगहरक देवतेचा स्वरूपात महाराष्ट्रात आली. खानदेशात सर्व जाती-जमातीचे लोक या ग्रामदेवतेची उपासना करतात.पोतराज हा ग्रामदेवतेचा उपासक असतो.कडकलक्ष्मी हा सुद्धा मरीआई ग्रामदेवतेचा उपासक आहे.त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सुद्धा असते.
मरीआई एक रौद्रदेवता असून तिचे सामर्थ्य फार मोठे असते. प्रसंगी ती लोकांच्या जीव घेते. तिच्या कोपाने पटकी,देवी आधी साथी येतात.भूतबाधा,घरातील भांडण तंटा,चेटून,करणी,मुलांचे आजार पण येऊ नये म्हणून आदिवासी भिल्ल, कोळी, ढोर, टोकरे कोळी, डोंगर कोळी, कोळी महादेव, कोळी मल्हार हे कोळी आदिवासी आषाढ महिन्यात मरीआईचा घाटा भंडारा करतात याला या आदिवासी गावघाटा असे म्हणतात.लाल कपड्याच्या देखील ध्वज चढवतात व आंब्याचा फांदीचा मांडव बांधतात.
मरीआईची यात्रा नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन निमित्त सालाबाद प्रमाणे भरविण्यात आली.यात्रेत तमाशा व कुस्ती यांना विशेष महत्त्व असते. कुस्तीमध्ये विविध गावातील पैलवानांनी सहभाग घेतला. आकर्षक भांडी व रोख रक्कम त्यांना मिळाली.धोबीपछाड, ढाक, निकाल,बांगडी,हरणफास असे अनेक कुस्तीचे डावपेच प्रेक्षकांना बघायला मिळाली.तरुण वर्गामध्ये कुस्ती बद्दल विशेष आकर्षण निर्माण झाले.
कुस्त्यांचे उद्घाटन कुस्ती क्षेत्राचे भीष्माचार्य व नामवंत मल्ल देवा (अण्णा) पैलवान यांच्या हस्ते करण्यात आले.न्याहाळोद हे मल्लांचे गाव असून तीन व्यायाम शाळा आहेत.घराघरात पैलवान आहेत.म्हणून पैलवानांचे गाव म्हणून न्याहाळोदची ख्याती आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात न्याहाळोदाच्या पैलवानांनी नाव लौकिक केले आहे.कुस्त्या पाहण्यासाठी धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांनी भेट दिली.त्यावेळी गावात कुस्तीसाठी स्टेडियम होणे काळाची गरज आहे.अशी मागणी करण्यात आली.कुस्ती पंच म्हणून देवा (अण्णा) रायते,मोहन शिरसाठ, पुंडलिक शिरसाठ, माजी सरपंच कैलास पाटील,आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे, विकास पवार, प्रकाश वाघ, प्रा.संतोष कढरे, भैय्या कढरे,सुनील कढरे, हनीफ खाटीक,आमीन शेख, ज्ञानेश्वर भोगे,रघुनाथ पवार, सुनील भील,कपिल माळी,सचिन माळी,किरण जाधव,मुसा पैलवान,गणेश धोबी,सुनील धोबी,ज्ञानेश्वर रोकडे,अर्जुन शिरसाठ, रावसाहेब भोगे,पिंटू भिल,परमेश्वर पवार,इ.मान्यवर उपस्थित होते.







