पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : १६ वर्षीय विद्यार्थिनीचे कपडे बदलतानाचे फोटो काढत ते प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्यावर गेल्या पाच वर्षे लैंगिक अत्याचार करण्यात आले. हा प्रकार पीडित मुलगी ११ वर्षांची असल्यापासून सुरु होता. याप्रकरणी पुणे पोलिसांनी संजय चिदंबरम कुलकर्णीला (४४ वर्ष) अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०१९ ते जुलै २०२५ दरम्यान हा प्रकार घडला. नराधम संजयचा पीडितेच्या कुटुंबाशी परिचय असून त्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने पीडित मुलगी ११ वर्षाची असताना तिचे कपडे बदलतानाचे फोटो काढले. ते फोटो दाखवून तिला ब्लॅकमेल केलं. तसेच सलग पाच वर्ष तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याशिवाय आरोपीने कारमध्ये पीडितीचा विनयभंग केला.
आरोपी संजय कुलकर्णी विरोधात १६ वर्षीय मुलीने भारती विद्यापीठात तक्रार दिली होती, या तक्रारीवरून पोलिसांनी यााप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण कायदा व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी आता भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपीला लवकरच न्यायालयात सादर केलं जाणार आहे.







