श्रावणी सोमवारी न्याहळोद येथील पंचमुखी महादेव मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी

पंचमुखी महादेव

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : न्याहळोद येथील पंचमुखी महादेव मंदिर परिसरात श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून भाविक दर्शनासाठी येत आहेत.

न्याहळोद येथील प्राचीन काळातील पंचमुखी महादेव मंदिर असून येथे भक्ती भावाने गावातील व बाहेरगावातील भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असून नुकताच कीर्तन सप्ताह व भगवत कथेचे आयोजन करण्यात आले. कथेचे आयोजन विठ्ठल रुक्माई मंदिर ट्रस्टमार्फत करण्यात आले. भागवत कथेचे प्रवचन ह भ प स्वप्निल दाजी महाराज श्री राम रुंदावन यांच्या अमृतवाणीतून करण्यात आले. श्रावण महिन्यात नियमित कार्यक्रम होत असून सोमवारी त्याची सांगता होत असते व गावाला महाप्रसादाचे आयोजन देण्यात येत असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here