खेड तालुका दिवा रहिवाशी सेवा संस्थेच्या २१ वा वर्धापनदिन शेकडोंच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

दिवा रहिवाशी सेवा

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीकुमार वन्नम) : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका दिवा रहिवाशी सेवा संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातील दिवा रहिवाशी माध्यमिक, उच्च माध्यमिक व शालांत परीक्षेत यश संपादन केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुण गौरव कौतुक सोहळा साऊथ इंडियन स्कूल सुरेश नगर स्टेशन रोड दिवा येथे थाटात संपन्न झाला. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले संस्थेचे प्रवर्तक लेखक प्रकाश चव्हाण प्रा. अर्जुन सांगळे संस्थेचे संस्थापक सदस्य माजी सचिव व मराठा क्रांती स्वराज्य संघटना रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष कृष्णा शेलार संस्थेचे अध्यक्ष उमेश भानसे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी दीपप्रज्वलन करून शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार भोसले यांच्या हस्ते घालण्यात आला.

या वेळी बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी सांगितले आज रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत मात्र कुशल कामगार वानवा आहे. पालकांनी आपल्या पाल्याला शिक्षणात कमी पडू देऊ नका. काहीही कष्ट उपसावे लागले तरी त्यांच्या निवडीच शिक्षण त्यांना द्या. समाजात आरक्षणाने विषमता निर्माण झाली आहे. त्या वर देखील शासनाने गांभीर्याने विचार करावा असे बोलताना भोसले यांनी सांगितले. आज अडीच हजार केवळ खेड तालुक्यातील रहिवाशांची घरे आहेत. संपुर्ण दिवा शहर हे कोकण वाशीयांनी व्यापले आहे. येथील भूमिपुत्रांच्या सौहार्दपुर्ण संबंध जोपासत आपली संस्कृती, सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय उपक्रम राबवण्यात ही सेवा भावी संस्थेचे कार्य गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी केले.
या वेळी अनेक मान्यवर यांनी मार्गदर्शन केले शैक्षणिक मार्गदर्शक संजय राक्षे, प्रा. उद्योजक मंथन चव्हाण, रघुनाथ मोरे, समाजसेवक कैलास बाईत, शंकर डांगे, प्रतीक शेवरकर, प्रवीण उतेकर, सुरेश मोरे, जयसिंग कांबळे, सौ. प्रद्या भुरंग, समीर मोरे, सौ स्वाती महाजन गणेश गायकवाड, सौ माधुरी गायकवाड, यशवंत भानसे, सौ कविता सोणसकर, यांच्या सह कार्याध्यक्ष संतोष जोशी सचिव सुरेंद्र मोरे खजिनदार मिलींद शिंदे यांनी यावेळी अथक प्रयत्न करून हा स्तुत्य उपक्रम सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी हा नेत्र दीपक सोहळा यशस्वी रित्या पार पाडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here