पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) । पद्मश्री डॉ मणीभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट (क्रीडा युवा कल्याण मंत्रालय भारत सरकार संलग्नित,नीती आयोग. भारत सरकार दिल्ली संलग्नित, आय एस ओ नामांकित )संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उल्लेखनीय कार्याबद्दल सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्नपुरस्कार प्रदान करण्यात येतो.
या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. हा कार्यक्रम पुणे येथे होणार असून, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.. सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय, पर्यावरण अवेअरनेस प्रोग्रॅम ,प्लांटेशन, ग्रामस्वच्छता अभियान, अध्यात्मिक, प्रवचनकार ,कीर्तनकार लेखक ,कवी गायन ,व्यसनमुक्ती वैद्यकीय सेवा, नैसर्गिक आपत्ती मदत, आदर्श शैक्षणिक कार्य ,संस्थात्मक कार्य , अपंग क्षेत्रातील कार्य, साहित्यिक , फ्रीलॉन्सर तसेच पत्रकारिता,इत्यादी क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आपल्या कार्याची माहिती बायोडाटा किंवा फाईल पाठवावी असे आवाहन करण्यात येत आहे. संपर्कासाठी जेष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे अध्यक्ष डॉ मणीभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट उरुळीकांचन ता हवेली जी पुणे पिन नंबर 412202.मोबाईल 9420173442,7507039542 यांच्याशी संपर्क साधावा.







