राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ चे काम कासव गतीने

राष्ट्रीय महामार्ग ७५२
गुंजाळ नगर ते देवळा १ कि, मी, रस्त्याची दुरावस्था.

नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) । भावडबारी ते गुंजाळनगर हा १० कि मी,चा टप्पा अतिंम टप्प्यात आहे,मात्र गुंजाळनगर देवळा शहर, ते ढेंगोढे ९ कि मी रस्त्याची दुरावस्था बघवत नाही, सद्या पावसाची संततधार सुरू आहे, रविवारी देवळ्याचा बाजार असतो लग्नाचा मुहूर्त आणि बाजाराच्या भाउ गर्दीत कित्येक महिला आणि लहान मुले पाय घसरून पडत असतात,तर कोणी दुचाकी वरुन खड्यात आडवे पडून जखमी होत आहेत, नाही म्हणायला राष्ट्रीय प्राधिकरण अधिकाऱ्यांनी देवळा शहरातील अनधिकृत बांधकामे काढून रस्ता मोकळा केला आहे, त्यासाठी प्रचंड पोलिस बंदोबस तैनात करावा लागला,तिच गत लोहोणेर जवळील राष्ट्रीय महामार्गाची, गावकऱ्यांनी समजुतदार पणा दाखवुन अतिक्रमणे काढून घेतली, तिन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ चे काम बी आर गोयल या नावाजलेल्या ठेकेदाराला देण्यात आले आहे.

 

ताहाराबाद नाका ते यशवंत नगर पर्यंतचे काम ही कसारा लोकल ट्रेन सारखं धिम्या गतीने सुरू आहे,गेल्या तीन वर्षांपूर्वी वाजा गाजा करत सुरू करण्यात आलेले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ चे काम हे कधी पाणी टंचाई तर कधी स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींना उचीत मोहबदला अदा न केल्याने रखडले होते,, शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन काम या पावसाळा संपन्यापुर्वी पुर्ण होणे गरजेचे आहे् ,
– कुबेर जाधव
समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक

नाशिक रोड
सटाणा शहरातील नगर पालिका समोर चौफुलीवरील रस्त्यावर पडलेला महाकाय खड्डा

अडीच तिन वर्षे उलटूनही अतिशय संत गतीने सुरू असलेल्या कामामुळे होणाऱ्या त्रासाने कसमादेसह नवापूर, नंदुरबार, सुरतसह कसमादेची जनता प्रचंड परेशान आहे, मागिल वर्षी सहा सात महिने पाणी टंचाई,व शेतकऱ्यांत्च्या अडथळा, यामुळे चालु काम खंडीत करण्यात आले होते, महामार्गा लगत असलेल्या जमिन धारक शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला न मिळाल्याने त्यांनी कामाला हरकत घेत काम बंद पाडले होते, सद्या रस्त्यावर प्रचंड धुळ,पाणी आणि चिखलाचा त्रास सहन करावा लागत आहे, भावडबारी घाटात चार कि मी पर्यंत दोन्ही बाजूंने घाटाच्या रूंदीकरणा साठी घाट कटींग चे काम युद्धपातळीवर सुरू आहे,शेतकऱ्यांनाही त्यांच्या जमिनीसाठी उचित मोबदला दिला गेला पाहिजे, ही त्यांची रास्त मागणी आहे, त्याबरोबरच कामही योग्य प्रकारे सुरू राहीले पाहिजे अशी सर्व सामान्य जनतेची अपेक्षा आहे, काम अत्यंत कासव गतिने सुरू असल्याने जनतेनला प्रचंड प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे, अद्यापही देवळा ते लोहोणेर या सात किलोमीटरच्या कामाला सुरुवातही केली नाही, मात्र गणपती मंदिरा लगत ढेगोंढा गावालगत चे काम सुरू आहे, पुढे खरी समस्या ही मोरे नगर ते यशवंत नगर या तीन किलोमीटर रस्त्याची आहे,
कंदाणे फाटा ते सटाणा शहर पर्यंतचा प्रवास जिवघेणा ठरतोय, जिजामाता उद्यान ते चारफाटा दरम्यान असलेल्या रस्त्याची दुरावस्था बघवत नाही, नगरपालिके समोर, असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरच्या रस्त्यावर महाकाय खड्डा पडला आहे, खड्यात जागेवरच मोठी वाहने पलटी होऊन जिवितहानी होउ शकते,सदर महाकाय खड्यात जाड खडी व मुरुम टाकला असता तर नक्कीच त्याचा चांगला परिणाम दिसून आला असला, परंतु त्या खड्ड्यात माती ठाकल्याने प्रचंड चिखल झाला आहे, त्यामुळे प्रंचड वहातुक कोडी होत आहे अपघात होऊन दुचाकी वाहने खड्यात पडत आहेत, किमान नगर पालिका व बस स्थानकाजवळ तरी खडी मुरूम टाकून रस्ता थोडा फार तरी दुरुस्त करून द्यावा अशी शहरवासियांची मागणी आहे,

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here