दारूच्या नशेत बायकोवर कुऱ्हाडीने वार; त्यानंतर ट्रेनसमोर केली आत्महत्या

crime
File Photo

जळगाव (उपसंपादक नंदुअप्पा पाटील) । दारुच्या नशेत नवऱ्याने बायकोवर कु-हाडीने जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास जळगाव तालुका पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बोरनार येथील प्लॉट एरिया परिसरात राहणारे आनंदा महारु धनगर (४२ वर्षे) यांनी दारूच्या नशेत रेखा धनकर (४२ वर्षे) बायकोवर कुऱ्हाडीने वार केला आणि त्यानंतर आनंदा धनगरने धावत्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात रेखा धनगर या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंदाने पत्नीवर जीवघेणा हल्ला करून आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here