पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) । शहरामध्ये सोमवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी , पंढरपूर शहर पोलिसांनी मोठी धाड टाकली. या धाडीत सुगंधित तंबाखू ने भरलेली तीन पांढरी पोती जप्त करण्यात आली. दोन लाख तेवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून, वशिम निसार तांबोळी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. २०ऑगस्ट रोजी पहाटे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पंढरपुर शहरामध्ये सुगंधी तंबाखु अवैधरित्या विक्री केली जाणार आहे . सध्या सदरची सुगंधीत तंबाखु ही पंढरपुर शहरातील वसीम निसार तांबोळी, रा. अकबर अली रोड, पंढरपुर यांचे घरी आहे , अशा प्रकारे मिळालेल्या बातमीच्या आधारावर , वसीम तांबोळी यांचे राहते घरी जाऊन तपासणी केली असता , सुगंधित तंबाखु असलेली तीन पांढऱ्या रंगाची पोती मिळून मिळून आली. सदर पोत्यामध्ये ५०० ग्रॅम वजनाचे सिलबंद सुगंधित तंबाखुचे पुडे असल्याचे निदर्शनास आले. सदर पाकिटे फोडून पाहिली असता, त्यास सुगंधित तंबाखुचा वास येत असल्याचे आढळून आल्याने , त्यांचेवर पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम २६ (२) (१),(२) (४), २७ (३) (९),३० (२) (a), ५९ भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७४, २७५, १२३ प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर ठिकाणी कारवाईमध्ये मिळुन आलेल्या मालामध्ये २,२३,०००/- रू किंमतीची तिन पांढऱ्या रंगाची पोती त्यामध्ये प्रत्येकी ५०० ग्रॅम वजनाची २२३ पाकीटे प्रत्येकी १०००/- रू किंमतीची असे एकुण २,२३,०००/- याचा अंतर्भाव आहे.
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, सहा. पोलीस अधिक्षक, प्रशांत डगळे, पंढरपुर उपविभाग पंढरपुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्वजीत घोडके पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ निलेश रोंगे, पोना विनोद शिंदे, पोकॉ राहुल लोंढे, शिवशंकर हुलजंती, मसपोफौ राजश्री कटके मपोकों/शोभा कदम यांनी केली आहे.







