हॉटेल व्यवसायिकाचा चाकूने भोसकून खून

knief
File Photo

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) । शहरातील नामांकित हॉटेल ‘पीकॉक गार्डन अँड रेस्टॉरंट’चे मालक संतोष शेट्टी (वय ४५) यांचा त्यांच्याच हॉटेलातील कामगाराने रागाच्या भरात खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ही घटना मंगळवारी (दि. २६) रात्री उशिरा घडली आहे. किचनमधला चाकू आणत तो अचानक त्यांच्या पोटात घुपसून व वार करून खून केला आहे. बेसावध असल्याचे पाहून त्याने वार केले. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव पसरला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी कामगार उमेश दिलीप गिरी (वय ३९) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गिरी काही दिवसांपासूनच पीकॉक हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. पगार व इतर कारणांवरून तो नेहमीच मालकाशी वाद घालत होता. मंगळवारी रात्री किरकोळ कारणावरून शेट्टी व गिरी यांच्यात वाद झाला. वाद चिघळल्यावर गिरीने संतापाच्या भरात स्वयंपाकघरातील चाकू उचलून आणला. तर बेसावध असलेल्या शेट्टी यांच्या गळ्यावर वार केला. त्यांच्या पोटात चाकू घुपसला. यात गंभीर जखमी झालेल्या शेट्टी यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे. उत्तमनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here