वडाळा पाथर्डी मार्गावर घरात शिरून चोरट्यांनी सव्वा सात लाख रूपयाचे दागिने चोरले

thief
file photo

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) । वडाळा पाथर्डी मार्गावरील एका वन लाईफ सोसायटीतील उघड्या घरात शिरून चोरट्यांनी सव्वा सात लाख रूपये किमतीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अ‍ॅड. आदिती बागुल यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गेल्या चार महिन्याच्या कालावधीत चोरट्यांनी उघड्या घरात शिरून ही चोरी केली. घरात शिरलेल्या अज्ञात चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे ७ लाख २५ हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास हवालदार खरोटे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here