शिवगंगई (वृत्तसंस्था) । येथे काल भाजप जिल्हा वाणिज्य शाखेचे सदस्य सतीश कुमार यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की त्यांना एका टोळीने मारहाण करून ठार मारले. अधिकाऱ्यांच्या मते, ही घटना राजकीय नव्हती तर वैयक्तिक कारणांमुळे घडली होती. भांडणाच्या वेळी कुमार आणि आरोपी गट दोघेही दारूच्या नशेत होते.आर्थिक वादातून ही हत्या झाली असावी, या निष्कर्षाप्रत प्राथमिक तपासात पोलीस आले आहेत.
या प्रकरणासंदर्भात पोलिस पाचहून अधिक जणांची चौकशी करत आहेत. तथापि, मुख्य आरोपी फरार आहे. शिवगंगई पोलिसांनी सांगितले की, आरोपीचा शोध घेवून लवकरच त्याला अटक केली जाईल. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. तामिळनाडूमध्ये आणखी एका भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या झाल्यानंतर दोन महिन्यांनी हे घडले आहे.
४ जुलै रोजी, राजकापट्टी येथील ३९ वर्षीय बालकृष्णन यांची दिंडीगुल जिल्ह्यातील सनारपट्टीजवळ हत्या करण्यात आली. मित्रांसोबत बोलत असताना मोटारसायकलवरून आलेल्या एका टोळीने त्यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी हल्ला केला. पोलिसांनी सांगितले की हल्लेखोरांनी गंभीर दुखापत करून घटनास्थळावरून पळ काढला. नंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दिंडीगुल जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला.







