पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) | दिनांक 29 ऑगस्ट हा दिवस “मेजर ध्यानचंद” यांचा वाढदिवस “राष्ट्रीय क्रीडा दिन” म्हणून साजरा केला जातो. विद्यालयात या दिवसाचे औचित्य साधून मेजर ध्यानचंद यांची जयंती क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात आली. हा दिवस भारताच्या समृद्ध क्रीडा वारशाचा, देशाला अभिमान वाटणाऱ्या आपल्या खेळाडूंचा गौरव व खेळाडूंच्या कामगिरीचा उत्सव साजरा करणारा हा दिवस. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री महेश इंगोले सर यांच्या शुभहस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
दिनांक 29 ते 31 ऑगस्ट या कालावधीत देशभर विविध क्रीडा स्पर्धा घेऊन हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त विद्यालयात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून हा दिवस साजरा करण्यात आला. विद्यालयातील इयत्ता 5 वी ते 10 वी मधील विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये सहभाग घेऊन आपले क्रीडा कौशल्य दाखवून दिले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.







