अहमदनगर (अहिल्यानगर) (जिल्हा प्रतिनिधी दिपक वरखडे) | शिरूर मुख्य कार्यालयास इतर ४ शाखा मिळून पुणे व नगर जिल्हयातील सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या विघ्नहर्ता सहकारी पतसंस्था लवकरच ५० कोटी रुपये ठेवींचा टप्पा गाठणार असल्याचा विश्वास प्रास्ताविक करताना संस्थेचे संस्थापक , चेअरमन सुभाषराव साठे यांनी व्यक्त केला .
पुणे व नगर जिह्यातील सहकार क्षेत्रात नावारूपाला आलेली व सभासद , खातेदार , ठेवीदार , कर्जदार यांच्या विश्वासास पात्र राहून काम करत असलेल्या विघ्नहर्ता सहकारी पतसंस्थेची ५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शिरूर मुख्य कार्यालयाच्या सभागृहात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संस्थेचे संस्थापक , चेअरमन सुभाषराव साठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .
या सर्वसाधारण सभेत संस्थेचे सभासदांची मुले यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळविलेल्या उज्ज्वल यश व इतरांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल या सर्वांचा शाल , श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला .
चेअरमन साठे पुढे म्हणाले की , माझ्या मनात पतसंस्था स्थापन करण्याचा कोणताही विचार नव्हता , पण काही तरी चांगले करायचे होते , म्हणून संस्था स्थापन केली . संस्थेचे काम अतिशय योग्य रितीने करण्यासाठी मी रात्र रात्र जागून विचार करूनच योग्य निर्णय घेतो . कोणताही खर्च करताना वर्षभर तरतूद करतो . ज्या कर्मचाऱ्यां नी स्थापने पासून काम केले त्यांच्या पगार वाढी विचार केला जाईल . त्यांचे आयुष्य म्हणजे संस्था आहे . कोणी ही मनापासून काम केले की , त्याचा विचार केला जातो . आगामी वर्षात सभासदांना लाभांश देण्याचा विचार आहे . आज आलेले लोकं माझ्या व संस्थेच्या प्रेमापोटी आले आहेत . संस्थेचे सभासद खूप हुशार असल्याने माझ्याकडून चुकीचे काम होणार नाही . मी कोणालाही कधी ही दुखावले नाही . आज अखेर संस्थेकडे ३५ कोटी रुपयांच्या आसपास ठेवी असून लवकरच सभासद , खातेदार व ठेवीदार यांच्या विश्वासास पात्र राहत काम करत राहून ५० कोटी रुपयांचा ठेवींचा टप्पा गाठू , असा विश्वास व्यक्त करत , ते पुढे म्हणाले की , संस्थेला लेखापरीक्षण अहवाल सातत्याने ” अ ” वर्ग मिळत आहे . संस्थेचे मुख्य कार्यालय शिरूर असून शिरूर तालुक्यातील शिक्रापूर व टाकळी हाजी येथे २ शाखा , तर पारनेर तालुक्यातील निघोज व जवळा येथे २ शाखा अत्यंत सक्षमपणे कार्यरत आहेत . संस्थेकडे २ कोटी ५० लाख रुपयांचे अधिकृत भांडवल उपलब्ध असून २४ कोटी रुपयांचे कर्ज समाजात पत असणाऱ्या कर्जदार सभासदांना च वाटप केले आहे . संस्थेने आज अखेर ५७ कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय केला आहे .
यावेळी उपस्थित सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना संचालक मंडळाने अभ्यास पूर्ण माहिती दिल्याने ही ५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली . सुत्रसंचालन संतोष कळसकर व व्यवस्थापक बबनराव बेलोटे यांनी केले , तर आभार प्रशासन प्रमुख रोहन साठे यांनी मानले . या सभेला व्हाईस चेअरमन अजित मदगे , संचालक अशोक कारखिले , गजाबा क-हे , दादाभाऊ गायकवाड , भाऊसाहेब गाडेकर , सुशांत साठे , निर्मला गाडीलकर , वैशाली लाळगे , रविंद्र कर्डीले , सलीम हवालदार , साहेबराव हिंगे , विजय घुले , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगर जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील , हभप निवृत्ती तनपुरे , पत्रकार दिपकराव वरखडे ,







