सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | मंगळवेढा पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या विविध गावातून बेकायदा अड्ड्यावरून पोलिसांनी सन 2018 ते 2021 या कालावधीत छापा टाकून 1लाख 70 हजार रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त केलेल्या न्यायालयाच्या निकालानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्या सक्षम सोलापूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या उपस्थितीत मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या आवारात जप्त केलेला मुद्देमाल तो नष्ट करण्यात आला.
अड्ड्यावरून सन 2018 ते 2021 या कालावधीत पोलिसांनी छापे टाकून 1 हजार 798 देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या होत्या या सर्व गुन्ह्याचा निकाल न्यायालयाकडून लागल्यानंतर राज उत्पादन शुल्क विभागाच्या साक्षीने मंगळवेढचे डी वाय एस पी डॉ. बसवराज शिवपुजे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरी गिड्डे पोलीस हवालदार प्रमोद मोरे दिगंबर गेजगे व अन्य दोन पंच यांच्या साक्षीने हा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे
दरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी मंगळवेढा शहरातील मिरवणूक कटाक्षाने पाहणी करून काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.







