अहमदनगर (अहिल्यानगर) (जिल्हा प्रतिनिधी दिपक वरखडे) | सध्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथे उपोषणाला बसले असून त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबई त दाखल झाले आहेत . या सर्वांच्या जेवणाची व राहण्याच्या व्यवस्थेसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणावर येत असून यात पारनेर तालुका ही मागे नाही . पारनेर कारखाना कामगारांच्या वतीने जेवणाची शिदोरी पाठवण्यात आली आहे .
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत . याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटील हे गेल्या ४ दिवसांपासून मुंबईत लाखो मराठा आंदोलन करत आहेत . मराठा बांधव लाखोंच्या संखेने सामील झाल्याने त्यांच्या राहणे व जेवणाची व्यवस्था कमी पडत आहे , म्हणून राज्यभरातून मोठी मदत मुंबईकडे रवाना होत आहे . मग यात पारनेर तालुका कसा मागे राहील .
पारनेर साखर कारखाना कामगारांच्या कामगार नेते शिवाजीराव औटी यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवार दि . २ रोजी जेवणा करिता भाजी , भाकरी , चटणी , लोणचे , पाणी बाटली घेऊन रवाना होत आहे . याकामी दिलीप निघुट , शंकर मुळे , दादाभाऊ सरोदे , सुखदेव सरोदे , सुनिल मुळे , पंढरीनाथ तिकोणे , पत्रकार दिपक वरखडे व इतरांनी पुढाकार घेतला असून मोठ्या प्रमाणावर मदत जमा झाली आहे .







