सिद्धनेर्ली येथे सह्याद्री देवराईच्या वतीने गणेश उत्सव निमित्ताने वृक्षप्रसाद उपक्रम संपन्न

सह्याद्री देवराई

कागल (महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी सतिश चव्हाण) | तालुक्यातील सिद्धनेर्ली येथील नदी किनारा कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवावेळी सह्याद्री देवराईचे प्रणेते सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून व सह्याद्री देवराई सिद्धनेर्ली व नदीकिनारा कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सव महाप्रसादावेळी महाप्रसादाबरोबरच गणेशभक्तांना वृक्षप्रसाद म्हणून एक देशी पर्यावरण पूरक फळरोप भेट देण्यात आले.

यावेळी मंडळाचे वतीने सेल्फी पॉईंट बनवण्यात आला होता.यावेळी गणराया सोबत त्या भक्ताचा फळ रोपा सह फोटो घेण्यात आला.व त्या गणेश भक्तांना दिलेले फळ रोपाचे रोपण करून मंडळाच्या 7057237723 या क्रमांकावर आपला फोटो पाठवण्याचे आवाहन करण्यात आले.या उपक्रमाची सुरुवात गावचे सरपंच दत्तात्रय पाटील यांच्या शुभहस्ते वृक्षारोपणाने झाली.तसेच सह्याद्री देवराईच्या डिजिटल सेल्फी पॉईंट चे फीत कापून गावचे माजी सरपंच यशवंत पाटील यांच्या हस्ते वृक्ष प्रसाद उपक्रमात सुरुवात झाली.
यावेळी सह्याद्री देवराई सिद्धनेर्लीचे प्रमुख मधुकर येवलुजे,श्री शाहू साखरचे संचालक सुनील मगदूम,कागल तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक कृष्णात मेटील,कॉम्रेड शिवाजी मगदूम,उमेश मगदूम,विवेक पोतदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष भारत माने,नागेश माने,शक्ति माने,रोहिदास माने,निवास गवळी,दीपक माने,प्रथमेश आवळे,पांडुरंग बामणे,सुभाष माने,सागर माने,संदीप माने यांच्यासह सह्याद्री देवराईचे व नदी किनारा कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सह्याद्री देवराईचे माननीय सुहास वायंगणकर,प्रमोद मगदूम,बाजीराव साठे यानी विशेष परिश्रम घेतले.उपस्थितांचे स्वागत सौरभ साठे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर येवलुजे तर उपस्थीतांचे आभार राहुल माने यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here