माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त २०० विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

एकनाथराव खडसे

जळगाव (संपादक सुनिल पाटील) । दिनांक 2 सप्टेंबर २०२५ वार मंगळवार रोजी श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात माजी अर्थ, महसूल, पांटबंधारे, कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, शेतकऱ्यांसाठी सतत झटणारे लोकाभिमुख नेतृत्व, सर्वसामान्यांचे व कार्यकर्त्यांसाठी तत्पर असलेले लोकनेते आमदार एकनाथराव खडसे तथा नाथाभाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीराम प्राथमिक – माध्यमिक विद्यालय मेहरुण येथे गोर गरीब , होतकरु विद्यार्थी – विद्यार्थिंनींना शालेय साहित्य व गणवेश वाटपाचा कार्यक्रम नाथ फाउंडेशनचे अध्यक्ष व श्रीराम प्राथमिक माध्यमिक विद्यालय सचिव अशोकभाऊ लाडवंजारी यांच्यातर्फे करण्यात आला होता

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲन्ड . भैय्यासाहेब रविन्द्रजी पाटील (प्रदेश सरचिटणीस.. राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) तर प्रमुख अतिथि म्हणून प्रमोद बापू पाटील (जिल्हाअघ्यक्ष.. राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार जिल्हा जळगांव) , ईजाजभाई मलिक (जिल्हाअघ्यक्ष.. राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महानगर जळगांव) , विकासदादा पंवार (जिल्हा समन्वयक.. राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) , माननीय श्री पन्नालाल वंजारी ( अध्यक्ष श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालय) माननीय श्री अशोकभाऊ लाडवंजारी (माजी नगरसेवक व माजी महानगर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सचिव श्रीराम प्राथमिक माध्यमिक विद्यालय )वाय एस महाजन ( जिल्हा सरचिटणीस.. राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जिल्हा जळगांव) , मजहरभाई पठाण (जिल्हाअघ्यक्ष.. राष्ट्रवादी काॅग्रेस अल्पसंख्यक आघाडी जिल्हा जळगांव) , राजुभाऊ मोरे (माजी नगरसेवक ..मनपा जळगांव) , सुनिल भैय्या माळी (माजी नगरसेवक ..मनपा जळगांव) , डॉ रिजवान खाटीक (माजी नगरसेवक ..मनपा जळगांव), नामदेवभाऊ वाघ (जिल्हाअघ्यक्ष.. राष्ट्रवादी ओबीसी सेल आघाडी महानगर जळगांव) , किरणभाऊ राजपुत (जिल्हाउपअघ्यक्ष.. राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महानगर जळगांव) , अरुण मेटकर साहेब , इब्राहिम तडवी सर (माजी जिल्हा अघ्यक्ष.. राष्ट्रवादी आदिवासी सेल )विद्यालयाचे संचालक मंडळ श्री गजानन लाडवंजारी, श्री रामचंद्र लाडवंजारी, श्री भगवान लाडवंजारी, संतोष भाऊ चाटे, तसेच श्री नामदेव वाघ ओबीसी सेल )मोहन पाटील सर, नामदेव पाटील रहीम तडवी , योगेश लाडवंजारी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचं स्वागत संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने करण्यात आले
कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम व सरस्वती मातेच्या पूजनाने झाली हे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रविंद्र भैय्या पाटील व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १ ते १० वी या वर्गातील एकूण २०० गरीब होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप श्री अशोकभाऊ लाडवंजारी यांच्या अनमोल अशा सहकार्यातून कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले
यावेळी श्रीराम प्राथमिक माध्यमिक विद्यालयाचे सचिव अशोक भाऊ लाडवंजारी यांच्यातर्फे अनमोल अशा सहकार्यातून शिक्षक दिना निमित्ताने श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला हा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करण्यात आला
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री प्रमोद पाटील (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगर) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच वाय एस महाजन सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व माननीय श्री एकनाथराव खडसे साहेब यांच्या कार्याची माहिती दिली
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रविंद्र भैय्या पाटील यांनी माननीय एकनाथ रावजी खडसे साहेब यांच्या कार्याची सविस्तर माहिती दिली व श्री अशोकभाऊ लाडवंजारी यांच्या कार्याची, व सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले व निश्चितच विद्यालयातील विद्यार्थी आपली शैक्षणिक प्रगती साधतील असा आशावाद व्यक्त केला
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक प्रमुख श्री अमित तडवी सर, सो प्रतिभा पाटील मॅडम, श्री दिनेश पाटील सर, सांस्कृतिक उपप्रमुख सरस्वती पाटील मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल चाटे सर, तर आभार अमित तडवी सरांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नाथ फाउंडेशन व श्रीराम प्राथमिक विद्यालयातील मुख्याध्यापिका ईश्वरी वंजारी मॅडम ,श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिवाकर जोशी सर ,श्रीराम प्राथमिक माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अनमोल असे सहकार्य केले व परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here