इंदापूर (प्रतिनिधी) । येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार गणेश धनवडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या निवासस्थानी भेट देत अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान चे सचिव विरसिह भैया रणसिंग यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले या प्रसंगी संस्था विश्वस्त शंकरराव रणसिंग, पत्रकार संभाजी रणवरे. बाळासाहेब कावळे उपस्थित होते.
यावेळी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने निमसाखर येथे जाऊन गणेश धनवडे यांचा केलां वाढदिवस साजरा करण्यात आला. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, ट्रस्टचे सचिव डॉक्टर गिरीश देसाई सर, ट्रस्टचे खजिनदार तुषार रंजनकर सर, ट्रस्टचे विश्वस्त अरविंद गारटकर सर, ट्रस्टचे एडमिनार दीपक जगताप सर, जावेद हबीब चे प्रमुख अमोल राऊत सर, तसेच शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्रचे केंद्रप्रमुख महादेव चव्हाण सर, तसेच शंकरराव पाटील कोपीवरच्या शाळेचे प्रमुख श्री भारत बोराटे सर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत गणेश धनवडे यांना दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वरचरणी प्रार्थना केली.
यावेळी शंकर रणशिंग भोसले ताराचंद, इंदापूर तालुका युवा शिवसेनाप्रमुख सुदर्शन रणवरे, निमसाखर लहुजी सेना शाखेचे अध्यक्ष बाळासाहेब घोडे, मच्छिंद्र खुडे यांनीही गणेश धनवडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.







