पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) । पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अवैध शस्त्रांच्या विरोधात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत ५० पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. ही मोहीम १३ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आली.
मोहिमेत चाळीस गुन्हे दाखल करून ४५ आरोपींना अटक करण्यात आले त्यांच्याकडून ५० पिस्तूल ७९ काडतुसे जप्त केली आहेत. तसेच धारदार घातक शस्त्र बाळगणाऱ्यांवर ९४ गुन्हे दाखल करून ६६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ९१ कोयता, १२ तलवार, ४ पालघन, ६ चाकू अशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या ५० शस्त्रांमध्ये १ गावठी कट्टा तर ४९ पिस्तूल आहेत.
या मोहिमेअंतर्गत विशेषतः गुन्हे शाखा युनिट चारने मोक्यातून सुटलेला आरोपी पवन देवेंद्र बनेटी (२४, पिंपळे गुरव) याला अटक करून त्याच्याकडून दोन पिस्टल व दोन जिवंत काडतुस जप्त केले. तसेच पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील सराईत गुन्हेगार गणेश कांबळे ऊर्फ मॅड गण्या (२३, रा.निराधार नगर, पिंपरी), ऋषीकेश ऊर्फ शेऱ्या राजु आडागळे (२४ उर्से, मावळ), बाबा सैफन शेख (२७, पिंपळे गुरव), राहुल ऊर्फ सोन्या प्रकाश ढगे (२५, सुसगांव ता. मुळशी), प्रताप ऊर्फ बाळु हनुमंत पवार (३२, पिरंगुट, मुळशी), वैभव रामकृष्ण विटे (२८, तळेगाव स्टेशन) यांच्यासह २५ सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त डॉ.शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (परि.०२) विशाल गायकवाड, पोलीस उपआयुक्त (परि.०१) संदीप आटोळे, पोलीस उपआयुक्त (परि.०३) डॉ.बापू बांगर, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शिवाजी पवार, सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व अंमलदार, सर्व गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वी केली आहे.







