जळगाव (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर गिरीश पवार) । पोलीस अधिक्षक जळगांव डॉ.श्री महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव येथील पथकास जळगांव जिल्हात अनेक इसम हे दहशत माजविण्याचे उद्देशाने अवैध अग्नी शस्र वापरत आहेत. सदर बाबत गोपनीय माहीती काढुन अश्या लोकांनावर पुढील योग्य ती कारवाई करा असे आदेशीत दिले.
त्यावरुन राहुल गायकवाड, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो, स्था.गु.शा यांना गोपणीयरित्या दिनांक ०४/०५/२०२५ रोजी बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, चरणसिंग चव्हाण व पंकज चव्हाण हे काळ्या लाल रंगाची पल्सर मोटर सायकल क्रमांक MP-६८-ZC-३३५७ वरणगांव शहरातील फुलगाव ब्रीज च्या खाली गावठी कट्टासह दहशत माजविण्याच्या उद्देशाने येणार आहे. त्याप्रमाणे गणेशत्सोव सन लक्षात घेवुन राहुल गायकवाड, स्था. गु.शा यांनी एक पथक तयार करुन पथकास हकीकत सांगून तांत्काळ घटणेठिकाणी पोहचण्यास सांगुन वरील मोटार सायकल क्रमांक व त्यावरील चालक यांना सापळा रचुन कारवाई करा असे सांगीतले त्यावरुन मिळालेल्या बातमीची खात्री केली असता वरील क्रमांकाची काळ्या लाल रंगाची पल्सर मोटर सायकल क्रमांक MP-६८-ZC-३३५७ हि त्यावर दोन संशयीत इसम यास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव १) चरणसिंग उखा चव्हाण वय-३६ रा-चौडी ता-जि-ब-हाणपुर (म.प्र) २) पंकज रतनसिंग चव्हाण वय-२५ रा-मोरझिरा ता-मुक्ताईनगर जि-जळगांव असे सांगीतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावटी बनावटीचा पिस्तोल व २ जिवंत काडतुस तसेच वरील क्रमांची काळ्या लाल रंगाची पल्सर मोटार सायकल व दोन मोबाईल असा अंदाजे १,२९,०००/ रु किंमतीचा मुद्देमाल विनापास परवाना बेकायदेशिर पणे दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगतांना मिळुन आला म्हणुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द वरणगांव पोलीस स्टेशनला CCTNS NO १९४/२०२५ आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही डॉ.महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, राहुल गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. जळगाव यांचे मागर्दशनाखाली उप निरीक्षक सोपान गोरे, पोह, यशवंत टहाकळे, प्रेमचंद सपकाळे, प्रितम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, बबन पाटील, रविंद्र चौधरी, सचिन घुगे, चापोह भरत पाटील सर्व नेम-स्था.गु.शा जळगांव यांनी केली आहे.







