पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) । पंढरपूर तालुका पोलिसांनी गणेशोत्सव च्या अनुषंगाने अवैध धंद्याविरुद्ध धडक मोहीम राबवून तारापूर देगाव या ठिकाणी देशी विदेशी दारूचा किंमत रुपये २५८०० रुपये किमतीचा अवैध दारूचा साठा पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलेला असून आरोपी विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई केलेली आहे
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पीएसआय भारत भोसले पोलीस पीएसआय दत्तात्रय तोंडले विजू गायकवाड मंगेश रोकडे हेड कॉन्स्टेबल सय्यद पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटाळ यांच्या पथकाने केली आहे.







