शालेय विद्यार्थांना सोईचा लाळगे मळा चारी रस्त्याचे मजबूतीकरणासह सिमेंट काँक्रीटीकरण होणे गरजेचे

लाळगे मळा

अहमदनगर (अहिल्यानगर) (जिल्हा प्रतिनिधी दिपक वरखडे) । श्री मुलिकादेवी विद्यालय व महाविदयालयात शिक्षण घेण्यासाठी लाळगे मळा चारी रस्ता ट्रॅक्टर गॅरेज ते वरद विनायक गणपती मंदिर या ११०० मीटरच्या रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली असून पावसाळयात तर पायी चालणे ही मुश्किल होते . या रस्त्या चे मजबूती करणासह सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात यावे , अशी मागणी श्री मुलिकादेवी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अप्पा वराळ पाटील व उपाध्यक्ष दौलत सुपेकर व इतरांनी आ . काशिनाथ दाते सर यांच्याकडे प्रत्यक्ष भेटत व लेखी निवेदनाद्वारे केली आहे .

निघोज येथील श्री मुलिका देवी उच्च माध्यमिक विद्यालय आणि महाविद्यालय येथे २ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नव्याने काम सुरू असलेल्या शिरूर ते बेल्हा हा राष्ट्रीय महामार्ग निघोज मधून जात असून याच महामार्गावर श्री मुलिकादेवी विद्यालय आणि महाविद्यालय असून या महामार्गावरून विद्यालय वा महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जाताना विद्यार्थ्यांची मोठी कसरत आणि गैरसोय होत आहे. या मार्गाने मोठी रहदारी असल्याने अपघाताची शक्यता जास्त प्रमाणात असते . शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो . त्यासाठी वरदविनायक गणपती मंदिर ते लाळगे मळा चारी रस्ता , प्रशांत अपार्टमेंट , इंदिरा आवास घरकुल पासून ते ट्रॅक्टर गॅरेज पर्यंतचा ११०० मीटर च्या रस्त्याचे कायम स्वरूपीचा मजबूतीसह सिमेंट काँक्रीटकरण करावा , अशी मागणी शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष अप्पा वराळ पाटील व उपाध्यक्ष दौलत सुपेकर यांनी आ . काशिनाथ दाते यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या चिखलमय व खडेयुक्त रस्त्याची सविस्तर माहिती देत या कुंड बायपास लाळगे मळा चारी रस्त्याची मागणी निवेदनाद्वारे करत आ . दाते यांना साकडे घातले आहे ,

या लाळगे मळा चारी रस्ता वरद विनायक मंदिरापासून ते प्रशांत अपार्टमेंट , ट्रॅक्टर गॅरेज या चारीच्या रस्त्याची पाटबंधारे विभागाच्या नारायणगाव कार्यालयाकडून यापूर्वीच मान्यता घेतलेली आहे. यासाठी आ . दाते यांचे कडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे विद्यार्थी , शिक्षक व पालकांनी आनंद व्यक्त केला आहे.

श्री मुलिका देवी विद्यालयाच्या निवेदनात पुढे म्हटले आहे की , निघोज हे गाव पारनेर तालुक्यात सर्वांत मोठे बागायत , बाजारपेठ व १२ वाडया वस्त्या असलेला मोठा हा परिसर आहे. वडनेर, ढवणवाडी, मोरवाडी, पठारवाडी, तुकाई मळा, बोदगेवाडी , कुंडवस्ती , पवार वस्ती व परिसरातील विद्यार्थी या विद्यालयात व महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येतात . विद्यार्थी , शेतकरी व इतरांसाठी कुंड बायपास लाळगे मळा चारी रस्ता वरदविनायक मंदिरात पर्यंत पर्यायी मार्ग काढला , तर सर्वांचीच मोठी गैरसोय टाळणार आहे. या रस्त्यावर पावसाळ्यात प्रचंड चिखल असतो , सायकल वा इतर वाहने सोडा , पायी प्रवास करणे ही जिकीरीचे आहे . इतर वेळेस सर्वत्र खड्डेच खड्डे असतात .
सध्या शिरूर ते बेल्हा या महामार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून कायम रहदारी चालू असणाऱ्या या रस्त्यावर भविष्यकाळात मोठ्या अपघाताला तोंड द्यावे , लागण्याची शक्यता नाकारता येत नाही . यासाठी हा ११०० मीटर लांबीचा लाळगे मळा चारी रस्ता हा चांगला पर्याय आहे , या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण होणे , काळाची गरज बनली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here