निघोजच्या विहा लामखडेने मिळवले राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक

विहा लामखडे

अहमदनगर (अहिल्यानगर) (जिल्हा प्रतिनिधी दिपक वरखडे) । ३४ वी जवाहरलाल नवोदय विद्यालयाच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये टाकळी ढोकेश्वर च्या जवाहरलाल नवोदय विद्यालयाची ८ वी ची विद्यार्थीनी विहा गणेश लामखडे हिने सुवर्ण पदक पटकावल्याने महाराष्ट्राचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिले गेले आहे .

नागपूर येथील पंतप्रधान श्री जवाहरलाल नवोदय विद्यालयात राज्य पातळीवरील नवोदय , केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ व राज्य माध्यमिक विभागातील नगर , धुळे , सातारा , कोल्हापूर, पुणे तील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . विभागीय तायक्वांदो स्पर्धा या नावाने भरविण्यात येते. त्यामध्ये विहाने सोनेरी पदक मिळविले . त्यानंतर समान विभागा मधून जिंकलेले सुवर्ण पदक विजेत्या विद्यार्थ्यांची स्पर्धा होते व त्यामध्ये ही सुवर्ण पदक विजेती विहा ही अजिंक्य ठरली. तिने सुवर्ण पदक मिळविल्या मुळे तिची राष्ट्रीय स्पर्धे साठी जम्मू काश्मीर मधील उदयपूर येथे निवड झाली , तेथे नुकत्याच दि . २६ व २७ ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या ३४ जवाहर नवोदय विद्यालय तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेमध्ये विहा गणेश लामखडे हिने सुवर्ण पदक पटकावले.
विहा लामखडे ही अष्टपैलू खेळाडू असून तिने या आधी गाव , तालुका , जिल्हा , राज्य पातळीवर चमकदारी करत आता राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदक मिळवत अपूर्व यश संपादन केले आहे . तिने निघोज येथे रणसिंग बंधूंच्या प्रशिक्षणाखाली कराटे प्रशिक्षण घेतले आहे . पारनेर तालुक्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गणेश लामखडे यांची कन्या आहे . विहा च्या या यशाने महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय पातळीवर चमकलेच, पण त्याच बरोबर नगर जिल्हा , पारनेर तालुका व निघोज नगरी च्या नावलौकिकात मोठी भर पडली आहे . या आधी ही विहा लामखडे राष्ट्रीय स्पर्धेत चंदेरी पदकाची मानकरी ठरली होती .
विहा लामखडे हिच्या या यशाचे प्रसिद्ध वास्तू विशारद वसंतराव वांढेकर , प्रसिद्ध उद्योजक ज्ञानदेव लंके , मळगंगा देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त संतोष रसाळ , शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिलराव शेटे , किसनराव कवाद , राजू कवाद , अर्जुनराव वराळ , राजेंद्र लंके , कराटे पंच विक्रांत रणसिंग , प्रशिक्षक ओंकार रणसिंग , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगर जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील , दैनिक पारनेर समर्थ च्या कार्यकारी संपादक सौ . निलम खोसे पाटील व इतरांनी कौतूक केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here