शेतकरी संघटनेचे प्रणेते कै.शरद जोशी यांची ९१ वी जयंती अंगार मळ्यात उत्साहात साजरी

शरद जोशी

नाशिक (उपसंपादक इंजि. कुबेर जाधव) । शेतकऱ्यांचे पंचप्राण कै, शरद जोशी यांच्या ९१व्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील आंबेटान येथिल कै शरद जोशी यांच्या अंगार मळ्यातील निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी चाकण येथील महाविद्यालयात तिन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन ही करण्यात आले होते.

आदरणीय कै,जोशी साहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात एकेकाळी शेतकरी संघटनेची मुलख मैदानी तोफ लक्ष्मीनाराव वडले यांनी शेतकऱ्यांचे पंचप्राण कै शरद जोशी यांच्या कार्यपद्धतीवर आधारित योगदानाबद्दल आपल्या अभ्यासपूर्ण व विनोदी शैलीत व्याख्यान देऊन तरुण विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले, भारतीय शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे, म्हणून स्वतः कोरडवाहू शेती चा अनुभव घेण्यासाठी १ जानेवारी १९७७ मध्ये चाकण शेजारील आंबेठाण सामुदायिक शेतीला सुरुवात केली,२५ मार्ग १९७८ ला चाकण येथे पहिले कांदा आंदोलन उभे केले.
ऑगस्ट १९७९ मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना केली, कै शरद जोशी यांच्या ९१ व्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी समारंभात विदर्भ, मराठवाडा, नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकरी संघटनेचे, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव,तसेच शिवसेना उपनेते लक्ष्मनराव वढले इतर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते, अंगार मळ्यातील ट्रस्टचे विश्वस्त प्रा, सुरेश मात्रे यांनी कै, शरद जोशी यांच्या ९१ व्या जयंतीचे आयोजन केले होते, कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी संघटनेचे मा, प्रांतिक अध्यक्ष लक्ष्मणराव वढले हे होते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी उपस्थित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here