एस.डी.फाऊंडेशनतर्फे गणपती विसर्जनाला कर्तव्यावर असलेले कर्मचाऱ्यांना फळे वाटप

एस.डी.फाऊंडेशन

जळगाव (संपादक सुनिल पाटील) । एस.डी.फाऊंडेशनतर्फे गणपती विसर्जन मिरवणूकीत कर्तव्यावर असलेल्या पोलिस बांधव, मनपा कर्मचारी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याच्याचा ठिकाणी जाऊन फळे देऊन सत्कार आणि क्षुधा शांती केली.

विसर्जन मिरवणूकीदरम्यान शांतता, सुरक्षितता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस, मनपा कर्मचारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना काळ वेळ न पाहता कर्तव्यावर हजर रहावे लागते. मात्र या दरम्यान त्यांच्या तहान भूकेची जाणीव झाली तरी गर्दीमुळे ते सहजसाध्य नसते. गणेश विसर्जन मिरवणूक सुव्यवस्थित व्हावी यासाठी कार्यरत असणाऱ्या या कर्मचाऱ्यांप्रती ऋण व्यक्त करण्याचा प्रयत्न एस.डी. फाऊंडेशनतर्फे करण्यात आला असल्याचे, संस्थेचे सचिव सुहास दुसाने यांनी सांगितले.
या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी केळी, सफरचंद आणि पेरु ही फळे वाटली गेली. तसेच केळीची साली एस.डी.फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी लगेच गोळा करुन आपले शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्याचा संदेश ही जळगाववासियांना दिला. फळे वाटपासोबत स्वच्छतेचा संदेश एस.डी.फाऊंडेशनतर्फे देण्यात आलाच पण गोळा केलेली केळीची साली मुक्या प्राण्यांना खाण्यासाठी दिली. माझे शहर माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत एस.डी.फाऊंडेशन तर्फे आपले शहर स्वच्छ,सुंदर आणि हिरवेगार करण्यासाठी प्रयत्न केला जात आहेच.
एस.डी फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधाकर दुसाने, सचिव सुहास दुसाने यांच्यासह भाग्यश्री दुसाने, चेतन दुसाने, प्रभुदत्त दुसाने या पुर्ण परिवारासह कुणाल पाटील, जतिन इंगळे, चेतन जाधव, तुषार साळवे तर फळांसाठी कुंदन महाजन, प्रियंका कुलकर्णी, माया गुरव,स्मिता वायकोळे,पद्मालय सर्जिकल,आरती ज्वेलर्स यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here