ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा कार्याध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार संजय महाजन; राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव

ग्रामीण पत्रकार संघ

अहिल्यानगर (जिल्हा क्राईम रिपोर्टर अण्णासाहेब बनसोडे) । अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्षपदी शिर्डीचे ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व साईश्रद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय विठ्ठल महाजन यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत असून ग्रामीण पत्रकार चळवळीला नवी ऊर्जा मिळाल्याचे मत व्यक्त होत आहे.

या निवडीसाठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने, राष्ट्रीय सरचिटणीस अशोक पवार तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेने महाजन यांच्यावर विश्वास दाखवला. पत्रकार बांधवांच्या समस्या, शासकीय कार्यालयांमधील अडचणी आणि ग्रामीण समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांचे आवाज बुलंद करण्यासाठी ही संघटना कार्यरत आहे. जिल्हा कार्याध्यक्षपदी महाजन यांच्या निवडीमुळे संघटनात्मक कार्य अधिक जोमाने पुढे जाणार आहे.
सामाजिक कार्याची ओढ आणि पत्रकारितेबरोबरच लोकसंग्रहाची कला यामुळे संजय महाजन हे नेहमीच सामान्य जनतेच्या संपर्कात राहिले. त्यांनी पोलीस मित्र संघटना, ग्रामीण पत्रकार संघ, बहुजन पत्रकार संघ आदी संघटनांमध्ये जबाबदाऱ्या सांभाळत प्रभावी काम केले आहे. शिर्डीत साईश्रद्धा प्रतिष्ठान स्थापन करून त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणविषयक विविध उपक्रम राबवले आहेत. कोरोना काळात जीव धोक्यात घालून पत्रकारिता करताना ते बाधित झाले, मात्र जिद्दीने संकटावर मात करून पुन्हा नव्या जोमाने समाजकार्यात सक्रिय झाले.
अभिनंदनाचा वर्षाव महाजन यांच्या निवडीबद्दल माजी सरपंच देविदास जिरे, अभियंता डी. के. इंगळे, निवृत्त शिक्षक भगवान रायते, सामाजिक कार्यकर्ते नारायण जिरे, अॅड. अशोक घरटे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप वैद्य, पत्रकार राजेंद्र गवळी, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पंढरीनाथ शंखपाळ, अक्षय महाजन, माजी मुख्याध्यापक रमेश गवळी, ओम शांती सेंटरच्या अध्यक्षा ठगुबाई जिरे, अंगणवाडी शिक्षिका शालिनी घरटे, शोभा महाजन, गोविंद गवळी, नाना गवळी, बापू गवळी, उद्धव जिरे, जितू जाधव, दादाजी जाधव, भूषण गवांदे, जगन्नाथ शंखपाळ, मधुकर महाजन, भगवान महाजन, भाऊसाहेब देशमुख, पत्रकार तुषार महाजन, पत्रकार विशाल रायते, पुष्पराज नाहीरे, गजानन इंगळे, डॉ. जानवी महाजन, निकिता घरटे, यामिनी घरटे, दिपाली महाजन, नीता रायते, अर्चना रायते, गौरी जिरे, श्रद्धा जिरे, प्रसाद रायते, अमित घरटे, सनी घरटे, निखिल घरटे, विकी साळवे, वैभव जिरे, गिरीश रायते, जिग्नेश जिरे आदी मान्यवर, पत्रकार बांधव व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here