सार्थक ,उर्वशी, प्रांजल व अनय यांना राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत कांस्यपदक

तायक्वांदो

जळगाव (उपसंपादक विवेक खडसे) | नुकत्याच नाशिक येथे पार पडलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो चॅम्पियन ऑफ द दुसऱ्या चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजन इंडिया तायक्वांदोच्या वतीने करण्यात आले होते यात बालगटामध्ये सार्थक चौधरी, उर्वशी बोरणारे ,प्रांजल सपकाळे व अनय महाजन यांनी तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या संघामध्ये जळगाव जिल्ह्यातून सहभाग नोंदविला होता.

25 किलो वजन गटात सार्थक चौधरी 35 किलो वजन गटात उर्वशी बोरणारे 38 किलो वजन गटात प्रांजल सपकाळे तर 38 किलो वजन गटात मुलांमधून अनय महाजन यांनी कांस्यपदक पटकाविले त्यांच्या या यशस्वीतेबद्दल खेल मंत्रालय भारत सरकार केंद्रीय मंत्री तथा राज्य मंत्री रक्षाताई खडसे यांनी त्यांना त्यांच्या हाताने मेडल प्रदान केले व त्यांच्या यशाचे कौतिक केले जळगाव जिल्ह्याचे नावलौकिक केल्याबद्दल या खेळाडूंना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या प्रसंगी खेळाडूंचे पालक त्या ठिकाणी उपस्थित होते विजय सर्व स्पर्धकांना त्यांचे प्रशिक्षक राजेंद्र जंजाळे यांचे मार्गदर्शन लाभले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here