अ.भा.ग्रा.पत्रकार संघ व जयहिंद लोकचळवळ यांच्यावतीने निर्माल्य संकलन केंद्राचे आयोजन

निर्माल्य संकलन

भडगाव (तालुका क्राईम रिपोर्टर अमीन पिंजारी) | दरवर्षी गणेश विसर्जनावेळी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य नदी व जलस्त्रोतामध्ये टाकल्या जाणाऱ्या निर्माल्यामुळे पाणी प्रदूषण होऊन पर्यावरणीय समतोलाचा गंभीर प्रश्न निर्माण होत असून त्यामुळे पर्यावरण व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी यावर्षी पर्यावरणपूरक उपक्रम अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ भडगाव तालुका व जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने भडगाव शहरातील गिरणा नदी पात्रा जवळ असलेल्या शनि महाराज मंदिरासह शहरातील अनेक ठिकाणी यांच्यावतीने  निर्माल्य  संकलन केंद्र उभारण्यात आले

या केंद्रांद्वारे गणेश भक्तांनी विसर्जनावेळी निर्माल्य वेगळे करून दिल्याने पर्यावरण रक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचला. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी भडगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे, अ.भा. ग्रा.प. संघाचे जिल्हा सल्लागार डॉ. बी. बी. भोसले, भडगाव ता.अध्यक्ष निलेश महाले, जि.उपाध्यक्ष भारत चव्हाण, सचिव यशकुमार पाटील, गुलाब नेरपगार, चेतन पवार, भाऊसाहेब सूर्यवंशी, समाधान पाटील, भाजपा सरचिटणीस विकास महाजन, नगरपरिषद आय.एस.ओ. तथा आस्थापना प्रमुख राहुल साळुंखे, नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक निशा लोट, नगरचना सहाय्यक प्रसाद अहिरे, लेखा परीक्षक नितीन लोखंडे, विद्युत अभियंता लखन घोडसर, स्वप्निल सोळंके, कर निरीक्षक अभिजीत मुंदानकर, लिपिक छोटू वैद्य,लिपिक शमसोद्दीन शेख, नितीन तेजी मुकादम, समीर येवले, विजय कंडारे, शेख असीम, कल्याण देशमुख,कमलाकर देशमुख, गणेश नरवाडे, ट्रॅक्टर चालक समाधान पाटील, जयहिंद लोकचळवळ समन्वयक आशुतोष पाटील, भूषण पवार, चेतन सोनवणे, यश महाजन, योगेश कोळी, श्रेयस कासार, तुषार देशमुख, तन्मय पवार, रोहित देशमुख, गणेश पाटील, यांच्यासह असंख्य पदाधिकारी व सदस्य शहरातील मान्यवर उपस्थित होते.
या संकल्पनेचे मुख्य उद्दिष्टे म्हणजे धार्मिक श्रद्धा व सांस्कृतिक उत्सवाबरोबरच पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडून पर्यावरण समतोल राखण्यास हातभार लागेल, भडगाव शहर “स्वच्छ व सुंदर व हरित” ठेवण्यास मोठी मदत होईल. यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास भडगाव शहरातील गणेश भक्तांनी उत्कृष्ट प्रतिसाद देत पर्यावरण संवर्धनाची जाणीव करून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here