जुन्नरमध्ये बड्या नेत्याच्या बर्थडे मिरवणुकीदरम्यान डीजे वाहनानं ६ जणांना चिरडलं

accident
file photo

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) । माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवस मिरवणुकीदरम्यान डिजे गाडीचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट बँड वाजवणाऱ्या तरुणांवर धडकली. या अपघातात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून सहा तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांचा वाढदिवस होता. लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर शहरातून मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. वाढदिवसानिमित्त डिजे लावून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. मात्र, या मिरवणुकीत भयंकर अपघाताची घटना घडली. डीजे गाडीचा ब्रेक झाला .
डिजे गाडीचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही दुर्घटना घडली. बँड वाजवणाऱ्या तरुणांना धडक बसली. वाहनाखाली अनेक तरूण चिरडले गेले. यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर, सहा तरुण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. अपघातानंतर स्थानिकांनी तरूणांना तातडीने खासगी रूग्णालयात नेले. सध्या त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. जुन्नर पोलिसांनी देवराम लांडेसह डिजे चालकाला अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here