पाचोरा पोलिसांच्या कारवाईत १८ तलवारी बाळगणाऱ्या एकास अटक

पाचोरा

जळगाव (उपसंपादक नंदुअप्पा पाटील) : जिल्ह्यातील पाचोरा शहरातील माहेजी नाका परिसरात कारवाई करत पोलिसांनी अवैधरित्या १८ तलवारी बाळगणाऱ्या सोहेल शेख तय्यब शेख (वय २४, रा. स्मशान भूमी रोड, बाहेरपुरा, पाचोरा) याला अटक केली आहे. त्याच्याजवळून जप्त करण्यात आलेल्या १८ तलवारींची अंदाजे किंमत ५४ हजार रुपये आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पाचोरा येथील माहिजी नाका परिसरात तलवारी विक्रीसाठी आणल्याची खबर मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोहेल शेखला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने तलवारी बाळगल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याने लपवून ठेवलेल्या ठिकाणाहून या तलवारी जप्त केल्या. त्याने काही तलवारींची यापूर्वीच विक्री केली असल्याचेही सांगितले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनिरी. कृष्णा घायाळ, पोउपनिरी. कैलास ठाकुर, पोकॉ संदीप राजपुत, पोकॉ जितेंद्र पाटील, पोकॉ हरीश परदेशी यांनी यशस्वीरित्या पार पाडली. पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here