सिंगापूरमध्ये प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांचे स्कूबा डायव्हिंग अपघातात निधन

झुबिन गर्ग

संचटेक (सिंगापूर) (वृत्तसंस्था) । प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांचे शुक्रवारी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग अपघातात निधन झाले आहे. झुबिन गर्ग यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी दुर्दैवी निधन झाले आहे. सिंगापूरमध्ये स्कूबा डाइविंग करत असताना त्यांचा अपघात झाला, ज्यात ते समुद्रात पडले. त्यांना तातडीने रेस्क्यू करून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले,परंतु ते जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. झुबिन गर्ग सिंगापूरमध्ये नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिवल मध्ये भाग घेण्यासाठी गेले होते, आणि त्यांना त्या फेस्टिवलमध्ये परफॉर्म करायचं होते.

२० आणि २१ सप्टेंबर रोजी संचटेक, सिंगापूर मध्ये त्यांचा परफॉर्मन्स होणार होता. झुबिन यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत फेस्टिवलचे आमंत्रण दिले होते. त्यात त्याने म्हटलं होतं”सिंगापूरमधील मित्रांनो, मी आपल्याला फोर्थ नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिवलमध्ये आमंत्रित करतो. २० तारखेला माझ्या लोकप्रिय हिंदी, बांग्ला आणि असामी गाण्यांवर परफॉर्म करणार आहे. कृपया सर्वांना आमंत्रित करतो, या कार्यक्रमात एंट्री मोफत आहे, आणि आम्हाला समर्थन देण्यासाठी सर्वांना येण्याचे आवाहन करतो.”अशी पोस्ट झुबिन यांनी दोन दिवसांपूर्वी पोस्ट केली होती.
१९७२ मध्ये मेघालयात जन्मलेले झुबीन हे एक आसामी गायक होते. त्यांचं खरं नाव झुबीन बोरठाकूर होतं. त्यांनी १९९० च्या दशकात गर्ग हे स्टेज नाव स्वीकारलं आणि त्यांचं आडनाव बदललं. २००६ मध्ये त्यांनी ‘गँगस्टर’ चित्रपटातील ‘या अली’ हे गाणे गायलं. या चार्टबस्टर गाण्यांच्या यशामुळे त्यांना देशभरात प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतरच्या काळात त्यांनी ‘सुबह सुबह’ आणि ‘क्या राज है’ यांसह अनेक बॉलिवूडला अनेक हिट गाणी दिली. झुबिन यांनी प्रामुख्याने आसामी, बंगाली आणि हिंदी चित्रपट आणि संगीत इंडस्ट्रीत काम केलं. पण, त्यांनी ४० हून अधिक भाषांमध्येही गाणी गायली आहेत. ते अनेक वर्षांपासून आसामचे सर्वाधिक मानधन घेणारे गायक होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here