मुंबईतल्या कांदिवली पश्चिम भागात पुजाऱ्याने केला तरुणीचा विनयभंग

विनयभंग
प्रतीकात्मक चित्र

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) । कांदिवली पश्चिम भागात लालजीपाडा परिसरात तारकेश्वर महादेव मंदिराच्या पुजाऱ्यानेच मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. तरुणीच्या घरच्यांनी तक्रार दाखल केल्यावर बदनामीच्या भीतीने आरोपी पुजाऱ्याने देवासमोरच दोर लावत फास घेत आत्महत्या केली.

या मंदिरात पुजारी पाच वर्षापासून देवाची पूजा करत होता. त्याने नित्याने दर्शनासाठी येणाऱ्या तरुणीला आक्षेपार्ह मेसेज पाठवले आणि पूजा करण्यासाठी घरी बोलावल आणि दार बंद करून शरीर सुखाची मागणी केली. तरुणीने घाबरल्या अवस्थेत पालकांना ही सगळी गोष्ट सांगितली पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश स्वामी अस या आत्महत्या करणाऱ्या पुजाऱ्याचे नाव आहे. तो मुळचा मध्य प्रदेश ग्वालियरचा राहणार होता. गेल्या पाच वर्षापासून तो तारकेश्वर मंदिरात पूजा करत होता. त्याची नजर त्या मुलीवर गेली आणि त्याने घृणास्पद कृत्य केल. गुन्हा दाखल झाल्याची त्याला कुणकुण लागली आणि अटक होण्याच्या भीतीने आणि बदनामी होईल याची त्याला भीती वाटली. देवेसमोरच त्याने फास घेतला आणि स्वतःच जीवन संपवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here